Colvale panchayat
Colvale panchayatDainik Gomantak

Colvale : कोलवाळ पंचायतीच्या उपसरपंचाविरोधात मांडला अविश्वास ठराव

नऊ सदस्यीय पंचायत मंडळातील सहा सदस्यांनी केल्या ठरावावर स्वाक्षऱ्या
Published on

Colvale : कोलवाळ पंचायतीच्या उपसरपंचा लिबरेटा फर्नांडिस यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. नऊ सदस्यीय पंचायत मंडळातील सहा सदस्यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Colvale panchayat
Sanguem : 15 वर्षांपासून दामाळ पाजीमळ ग्रामस्थांना भेडसावतेय पाण्याची समस्या

कोलवाळ येथील बेकायदा भंगारअड्ड्यांवर कारवाई न केल्याने उपसरपंचा फर्नांडिस यांच्याविरूध्द सहा पंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली आहे. सरपंच शितल चोडणकर, सुप्रिया कानोळकर, दशरथ बिचोलकर, प्रियंका बिचोलकर, योगीता चोडणकर व रती उर्फ रितेश वारखंडकर या पंचसदस्यांचा समावेश आहे.

अविश्वास ठरावाचा अर्ज गट विकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर पंचायत मंडळाची बैठक घेण्याची मागणी या नोटीसीतून केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com