Mapusa: भूमीपुजनाचा नारळ न फोडताच विकासकामाला प्रारंभ; म्हापसा पालिकेमध्ये सत्ताधारी गटात आलबेल नाहीच!

मागील चार दिवसांपूर्वी जुन्या म्हापसा पालिका इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून सध्या इमारतीची कौले हटविण्याचे काम सुरू आहे.
Mapusa Municipal
Mapusa MunicipalDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa: एरवी शहरातील छोट्या-मोठ्या विकासकामांचा नारळ वाढवून औपचारिक पद्धतीने श्रीगणेशा करणाऱ्या म्हापसा पालिकेने महत्त्वपूर्ण आता ईद ग्रंथालय इमारतीच्या कामाचा कुठलाही औपचारिक कार्यक्रम न करताच या प्रकल्पाचे काम सुरू केल्याने सत्ताधारी गटात आलबेल नाही, अशा चर्चेला उधाण आले आहे.

अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या ग्रंथालयाच्या नूतनीकरणास चालना मिळाली असून चार दिवसांपूर्वीच या इमारतीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे.

मुळात या कामाची औपचारिक पायाभरणी न करताच हे काम सुरू केले आहे. 6 डिसेंबर रोजीच नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांच्या वाढदिनी हा कार्यक्रम आयोजिला होता.

मागील चार दिवसांपूर्वी जुन्या म्हापसा पालिका इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून सध्या इमारतीची कौले हटविण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम संपवून ग्रंथालय सुरू करण्यात येईल.

येथील काही फाईल्स नवीन पालिका इमारतीत सुरक्षित स्थलांतरित केल्याची माहिती नगराध्यक्षा वायंगणकर यांनी दिली. मात्र, औपचारिक कार्यक्रम व पायाभरणीशिवाय हे काम कसे सुरू केले, असा प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

Mapusa Municipal
Manohar Airport:...तोपर्यंत साखळी आंदोलन सुरूच ठेवणार; टॅक्सी चालकांचा निर्धार

नगराध्यक्षांच्या वाढदिनी ग्रंथालय इमारतीचा जीर्णोद्धार व भाजी मार्केट परिसरातील सौरऊर्जा पॉवर प्लांटचे उदघाटन होणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द केला होता.

सत्ताधारी नगरसेवकांना या कार्यक्रमांविषयी माहिती उशिराने दिल्यानेच त्यांनी या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे ठरविले होते! या प्रकारामुळे सत्ताधारी गटातील हे नाराजीनाट्य सर्वांसमोर आलेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Neighbor Dispute Assault Mapusa
Mapusa Bill Dispute Violence
Mapusa Market Nullah Cleaning
Mapusa Market Security Action Plan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com