Goa Assembly: दक्षिण जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ देणार नाही; विरोधक सभापतींच्या हैदात
Goa Assembly Monsoon Session 2024Dainik Gomantak

Goa Assembly: दक्षिण जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ देणार नाही; विरोधक सभापतींच्या हैदात

Goa Assembly Monsoon Session 2024: मंत्री राणे यांनी याप्रकरणी उत्तर देताना प्रक्रिया सुरु असून अंतिम निर्णय न झाल्याची माहिती दिली.
Published on

दक्षिण जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई आक्रमक झाले. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधी बाकावरील आमदारांनी सभापतींच्या हौदात जात गोंधळ घातला.

गोवा पावसाळी अधिवेशनच्या नवव्या दिवशी आरोग्य खात्यासंबधित प्रश्नांवरुन विरोधकांनी मंत्री विश्वजीत राणे यांना धारेवर धरले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत मंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली.

मंत्री राणे यांनी याप्रकरणी उत्तर देताना प्रक्रिया सुरु असून अंतिम निर्णय न झाल्याची माहिती दिली. मंत्र्यांकडून रितसर उत्तर येत नसल्याचा दावा करत आलेमाव यांनी गोंधळ घातला.

Goa Assembly: दक्षिण जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ देणार नाही; विरोधक सभापतींच्या हैदात
Dabolim Airport: विमानाच्या टॉयलेटमध्ये ओढत होता सिगारेट; दाबोळी पोलिसांकडून आंध्राच्या प्रवाशाविरोधात गुन्हा

याच मुद्यावरुन विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याचा दाखला देत मंत्री चुकीची माहिती देत असल्याचे म्हटले. तसेच, सीव्हीसी नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला व असे झाल्याने मंत्री राणे यांना बेड्या पडतील असेही सरदेसाई म्हणाले.

दरम्यान, मंत्री राणे यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया सुरु आहे. सीव्हीसी नियमावलीचे उल्लंघन केले जाणार नाही. जो कोणी याचे उल्लंघन करेल तो तुरुंगात जाईल, असे राणे म्हणाले.

मंत्र्यांच्या उत्तरावरुन समाधानी न झालेल्या विरोधकांनी प्रस्तावित खासगी रुग्णालय होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत सभापतींच्या हौदात प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com