Dabolim Airport: विमानाच्या टॉयलेटमध्ये ओढत होता सिगारेट; दाबोळी पोलिसांकडून आंध्राच्या प्रवाशाविरोधात गुन्हा

South Goa Dabolim Airport: अलार्म वाजल्याने विमानातील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
Dabolim Airport: विमानाच्या टॉयलेटमध्ये ओढत होता सिगारेट; दाबोळी पोलिसांकडून आंध्राच्या प्रवाशाविरोधात गुन्हा
Flights Lavatory
Published on
Updated on

विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगारेट ओढणाऱ्या आंध्र प्रदेशच्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर बुधवारी (२४ जुलै) हा प्रकार उघडकीस आला.

दाबोळी पोलिसांनी गड्डम श्रीनिवास (रा. बिकानूर, आंध्रप्रदेश) या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी गड्डम श्रीनिवास दाबोळी विमानतळावरील इंडिगो फ्लाईटच्या टॉयलेटमध्ये सिगारेट ओढत असल्याचे आढळून आले. विमानातील अलार्म वाजल्याने प्रवाशाने सिगारेट फ्लश केले.

अलार्म वाजल्याने विमानातील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. अखेर दाबोळी पोलिसांनी या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Jambavali Dhyan Foundation Goshala
Fake Traffic Challan Scam
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Dabolim Airport
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com