Railway Ticket Black Marketing: तिकिटांच्या काळ्या बाजाराला दणका, आरपीएफची 'ऑपरेशन उपलब्ध' मोहीम; कर्नाटक-गोव्यात 17 एजंट अटकेत

17 Agents Arrested Goa Karnataka: रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी नैर्ऋत्य रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एप्रिल महिन्यामध्ये राबविलेल्या ‘ऑपरेशन उपलब्ध’ मोहिमेत मोठी कारवाई केली आहे.
Railway Ticket Black Marketing
Railway Ticket Black MarketingDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव/पणजी: रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी नैर्ऋत्य रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एप्रिल महिन्यामध्ये राबविलेल्या ‘ऑपरेशन उपलब्ध’ मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कर्नाटक आणि गोवा राज्यांतील विविध ट्रॅव्हल एजन्सी आणि संशयास्पद ठिकाणी छापे टाकून १७ तिकीट एजंटांना अटक करण्यात आली.

प्रवाशांना अधिकृत दरात आणि पारदर्शक पद्धतीने रेल्वे तिकिटे उपलब्ध व्हावीत, यासाठी ‘आरपीएफ’ने ही मोहीम अधिक तीव्र केली होती. तपासादरम्यान एजंटांकडून २२ रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत ८१ हजार ५५३ रुपये इतकी आहे. याशिवाय ८२ वापरलेली तिकिटेही ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची किंमत १ लाख ६१ हजार ७५२ रुपये आहे. एकूण जप्त तिकिटांची किंमत सुमारे २.४३ लाख रुपये इतकी असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Railway Ticket Black Marketing
Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

‘आरपीएफ’ने स्पष्ट केले की, सणासुदीच्या काळात आणि गर्दीच्या हंगामात काही एजंट प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन जादा दराने तिकिटांची विक्री करतात.

अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर मॉनिटरिंग, अचानक छापे आणि ऑनलाईन बुकिंगवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नैर्ऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. अनंत यांनी प्रवाशांनी अधिकृत माध्यमांतूनच तिकिटे आरक्षित करावीत. तसेच काळाबाजाराची माहिती मिळाल्यास तत्काळ ‘आरपीएफ’ला कळवावे, असे आवाहन केले आहे.

रेल्वे प्रशासनाने विनातिकिट प्रवास करणाऱ्या फुकट्यांवरही मोठी कारवाई केली असून ही मोहीम यापुढे अशीच सुरू राहणार आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना

ट्रॅव्हल एजन्सींवर अचानक छापे

ऑनलाईन बुकिंगवर विशेष नजर

सणासुदीच्या काळात वाढीव तपासणी

प्रवाशांना अधिकृत माध्यमांतून आरक्षणाचे आवाहन

Railway Ticket Black Marketing
Goa Tourism: गोव्यातला 'स्वर्ग...'! शॉपिंग, बीच शॅक्स अन् अथांग सागराचं लावण्य अनुभवायचयं; 'हा' समुद्रकिनारा तुमच्यासाठी बेस्ट

‘रेल्वे’ची धडक कारवाई

१७ प्रकरणांत १७ एजंट अटकेत

२२ चालू तिकिटे जप्त. किंमत ८१,५५३ रुपये

८२ वापरलेली तिकिटे ताब्यात

एकूण जप्त रक्कम २.४३ लाख रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com