धक्कादायक! केपे येथील अंगणवाडीचे छप्पर कोसळले

घटना रात्री घडल्याने अनर्थ टळला
धक्कादायक! केपे येथील अंगणवाडीचे छप्पर कोसळले
Dainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: केपे मतदार संघातील खोला पंचायत क्षेत्रातील गंवळ या ठिकाणी एका घरातील खोलीत चालणा-या अंगणवाडीचे छप्पर बुधवार दि.6 रोजी, रात्री अकस्मात कोसळले. सुदैवाने प्राणहानी टळली.आज दि.7 रोजी, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी सरकारी अधिकाऱ्यासह भेट देऊन पाहणी केली. स्थानिक क्लबच्या मदतीने पर्यायी व्यवस्था आमदार डिकोस्टा यांनी केली असून नवीन अंगणवाडी बांधून देण्यास प्राधान्य क्रमाने प्रयत्न करणार असल्याचे स्थानिक नागरिकांना भरोसा दिला.

(roof of the Anganwadi collapsed at Kepe )

धक्कादायक! केपे येथील अंगणवाडीचे छप्पर कोसळले
मडगावात चक्क न्यायालयच बनले तळे!

सविस्तर वृत्तानुसार गंवळ येथील एका स्थानिक व्यक्तीच्या घराच्या खोलीत चालते. याठिकाणी 23 चिमुकले विद्यार्थी शिकतात. गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री छप्पर कोसळले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

खोला गंवळ येथील अंगणवाडीचे छत कोसळल्याने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांचे खुपच हाल होणार असल्याचे लक्षात घेऊन आमदार एल्टन डिकोस्टा यांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन त्यावर तोडगा काढण्यात यावा याकरीता लोकांसोबत बैठक घेऊन अंगणवाडी मुलांकरिता जागेची व्यवस्था करण्यात आली.

यावेळी प्रभाकर वैझ, केपे कॉंग्रेसचे सोशल मिडीया कोर्डीनेटर ब्रिजेश देयकर, केपे युवा कॉंग्रेसचे सरचिटणीस गुरु वेळीप, अंगणवाडी सेविका व गावचे इतर नागरिक उपस्थित होते.

यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता म्हणाले की, मला केपे मतदार संघात कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही.लोकांची कामे त्वरीत व्हावे याकरीता आपला प्रयत्न असेल. केपे मतदार संघातील प्रत्येक लोकांच्या समस्येची जाण असून आगामी काळात सर्व मस्या सोडवण्याकरीता प्रयत्न असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com