मडगावात चक्क न्यायालयच बनले तळे!

सतत पाऊस पडत असल्याने आता पावसाची पाणी इमारतीत शिरु लागले आहे.
Rainwater in the old court building in Margao
Rainwater in the old court building in MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावची जुनी न्यायालयीन इमारत ही पोर्तुगीज कालीन. शेकडो वर्षांपुर्वीची. मात्र तिची वेळोवेळी दुरुस्ती केली जात नसल्याने आता पावसाळ्यात त्याचे परिणाम दिसु लागले आहेत. मध्यंतरी मागील काही वर्षांचा अनुभव घेवुन पावसाळा सुरु होण्यापुर्वी इमारतीच्या कौलांवर प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले व कर्मचाऱ्यांना, न्यायाधिशांना, वकिलांना व लोकांना थोडातरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सतत पाऊस पडत असल्याने आता पावसाची पाणी इमारतीत शिरु लागले आहे.
(Rainwater in the old court building in Margao)

Rainwater in the old court building in Margao
कोलमरड नावेली येथे मलनिस्सारण वाहिनीचे पाणी रस्त्यावर!

कॉरीडोअर, कोर्टरुम मध्ये सुद्धा पाणी वरुन खाली येत आहे. ही वारसा इमारत म्हणुन नोंद आहे. व तिची वेळोवेळी दुरुस्तीची मागणी होत असुनही कायदा खात्याने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या होत्या पण दुरुस्तीचे काम करायला कोणी कंंत्राटदारही पुढे येत नाही.


दक्षिण गोवा वकील संघटनेने याची गंभीर दखल घेऊन दक्षिण गोवा प्रिंसिपल व सेशन न्यायाधिशांची भेट घेऊन इमारतीची दुरुस्ती तातडीने करणयाची मागणी केली.
दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक यानी न्यायाधिशांना एक पत्र लिहुन परिस्थितीची माहिती दिली व दुरुस्तीची मागणी केली. कॉरिडोअरमध्ये निसरड झाली असुन कोणीही घसरुन पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. ही भयानक व अपघातग्रस्त परिस्थिती आहे असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com