Rohan Khaunte: राज्यातील पर्यटनासाठी कॅसिनोंची गरज नाही; मंत्री खंवटेंचे मत

Rohan Khaunte: हरित पर्यटनाची धरणार कास
Minister Rohan Khaunte Interview
Minister Rohan Khaunte InterviewDainik Gomantak
Published on
Updated on

Minister Rohan Khaunte Interview: राज्यात कॅसिनो आला, त्याचा राज्याला नक्की किती फायदा झाला हा एक प्रश्‍नच आहे. राज्यातील पर्यटनासाठी कॅसिनोंची गरज नाही, पण दुर्दैवाने पर्यटन सध्या कॅसिनोवर अवलंबून राहिले आहे.

परंतु कॅसिनो बंद झाले, तर त्याचा पर्यटनावर काहीही परिणाम होणार नाही, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोमन्तक टीव्हीच्या ‘एडीटर्स टेक’ या मुलाखतीत सांगितले. दरम्यान, पुढील काळात हरित पर्यटनाची कास धरली जाईल, असेही ते म्हणाले.

Minister Rohan Khaunte Interview
Worms in Mid Day Meal: धक्कादायक : माध्यान्ह आहारात सापडल्या अळ्या, तीन ठिकाणी घडला प्रकार

जागतिक पर्यटनदिनाच्या निमित्ताने गोमन्तक टीव्हीसाठी संपादक संचालक राजू नायक यांनी मंत्री खंवटे यांची मुलाखत घेतली. गोव्यात ‘इंटरटेन्टमेंट झोन’ करण्यावर यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा झालेली आहे.

इंडोनेशिया, बाली गेला तर तुम्हाला ‘इंटरटेन्टमेंट झोन’, ‘पार्टी झोन’ पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी कोणतीही वस्ती नाही, तेथे पूर्णपणे पर्यटक त्या सुविधांचा आनंद घेतात. अशा सुविधा आपल्याकडे करायच्या झाल्यास त्याचा धोरणात समावेश करावा लागेल.

Minister Rohan Khaunte Interview
Goa Accident: मुलीला महाविद्यालयात सोडण्‍यासाठी जाताना फांदी पडून आई ठार; नावेलीतील घटना

खंवटे म्हणाले, शॅक्स धोरण आणले, त्यात त्रुटी काय आहेत म्हणून बोलले जाते, परंतु त्याचा फायदा किती आहे हे पाहिले जात नाही. जे लोक पूर्वी गोव्यात येत होते, ते आता गोव्यात येत नाहीत. कारण ज्या पद्धतीने गोव्याची स्थिती झाली आहे, ती त्याला कारणीभूत आहे.

एका बाजूला आपण परशुरामाची भूमी म्हणतो, अध्यात्मावर बोलतो, त्याशिवाय छत्रपती शिवरायांविषयी, सायबांविषयी आपण बोलतो, तेव्हा ही पर्यटकांना ओळख करून देणे आवश्‍यक आहे.

कॅसिनो हवेत का नको यावर चर्चा होते, तेव्हा कॅसिनो नसले तरी काही फरक पडत नाही. पुढे चांगले होईल, असा विचार करून जेव्हा आपण मार्गक्रमण करतो, तेव्हा तो यशस्वी होतो असे आपण मानतो.

स्थलांतरितांमुळे पर्यटनाला धक्का

पर्यटकांशी स्थानिक लोक जे वागतात, ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. परंतु राज्यात स्थलांतरित आल्यानंतर पर्यटनाला निश्‍चित धक्का बसला आहे.

जी बेकायदा हॉटेले आहेत, ती पंचायतीकडे जर नोंदणी केलेली नसतील, तर त्यांच्यावर कारवाई होत आहे. ज्या पद्धतीने महसूल गळती होत आहे, त्याला आळा घालण्याचे काम पर्यटन खाते करीत आहे, असेही खंवटे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com