Goa Mid Day Meal with Worms
Goa Mid Day Meal with WormsDainik Gomantak

Worms in Mid Day Meal: धक्कादायक : माध्यान्ह आहारात सापडल्या अळ्या, तीन ठिकाणी घडला प्रकार

पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
Published on

Worms Found In Mid-Day Meal In Three Goa Schools: सावईवेरे, वळवई व केरी भागातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात चक्क अळ्या आढळल्याची घटना आज घडली. त्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुलांना कोणतीही बाधा झाली नसली तरी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले. तसेच या प्रकाराची गंभीर दखल घेत यासंबंधीचा पूर्ण अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून मागवला आहे.

मंगेशी येथील उत्कर्ष महिला स्वयंसाहाय्य गटातर्फे माध्यान्ह आहारात वरील भागातील सर्व सरकारी प्राथमिक तसेच सरकारी व खासगी हायस्कूलमध्ये पुलाव पुरविण्यात आला होता, तो मधल्या सुट्टीत मुलांना देण्यात आला. परंतु नंतर त्या पुलावातील सोयाबीनमध्ये अळ्या सापडल्यामुळे एकच तारांबळ उडाली.

शिक्षकांनी मुलांना तो न खाण्याची सूचना दिली. तोपर्यंत काही मुलांनी पुलाव खाल्ला होता. यावेळी कंत्राटदाराशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या दुकानातून सोयाबीन खरेदी केले, त्यात अळ्या असल्याची पूर्व कल्पना आम्हाला नव्हती. नंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले.

Goa Mid Day Meal with Worms
Goa Tourism: पर्यटन पर्यावरणाच्या मुळावर; ‘कॅग’चा ठपका

नमुन्यांची तपासणी

फोंडा तालुक्यातील सावईवेरे, वळवई व केरी भागातील शाळांमध्ये माध्यान्ह आहारात अळ्या सापडल्याने या प्रकाराची राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने त्वरित दखल घेतली.

अन्न व औषध प्रशासन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी लगेच अळ्या सापडलेल्या माध्यान्ह आहाराचे नमुने घेतले असून ते तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

मंगेशीतील स्वयंपाकघराची पाहणी

मंगेशी येथील एका स्वयंसेवी गटातर्फे हा माध्यान्ह आहार पुरवला जातो, त्या गटाच्या स्वयंपाकघराचीही तपासणी खात्यातर्फे करण्यात आली आहे. माध्यान्ह आहारासाठी स्वयंपाक करणाऱ्या महिलांकडेही यासंबंधी चौकशी करून त्यांचे म्हणणे नोंद करून घेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com