Prashasan Tumchya Daari: दलालांमुळेच पर्यटन व्यवसायावर परिणाम : रोहन खवंटे

वॉटर स्पोर्टस् उद्योगाला चालना देण्यास सरकार कटिबद्ध
Rohan Khaunte Interact With Public
Rohan Khaunte Interact With Public Dainik Gomantak

खाण उद्योग सध्या बंद असल्यामुळे गोव्यासाठी पर्यटन हा महसूल मिळवून देणारा उद्योग ठरत आहे. किनारपट्टीत किंवा ग्रामीण भागांमध्ये पर्यटन संदर्भात साधन सुविधा वाढविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. तरी सुद्धा दलालांमुळे गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होत असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी मान्य केले.

पर्यटन क्षेत्रामध्ये जे जे उद्योग आहेत, त्यात दलालांचा हस्तक्षेप वाढलेला आहे. त्यामुळे जो मूळ धंदा चालवतो, त्याला कमी व दलालांना जास्त नफा होत आहे. या दलालांमुळे डान्स बार, वेशा व्यवसाय वाढत आहेत.

यावर नियंत्रणासाठी सरकार ठोस उपाययोजनांच्या प्रयत्नात आहे. दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस कुमक अपुरी पडत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी दलालांपासून दूर राहावे, असे पर्यटन मंत्री खवंटे यांनी स्पष्ट केले.

Rohan Khaunte Interact With Public
MLA Disqualification : अपात्रता प्रकरणी आठ आमदारांबाबत 24 रोजी सुनावणी

वॉटर स्पोर्टस उद्योगाला चालना देण्यास सरकार कटिबद्ध असून केंद्रामध्ये मोदी सरकारने 9 वर्षे, गोव्यात डॉ. प्रमोद सावंत सरकारने चार वर्षे व भाजप सरकारने गोव्यात 11 वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रशासन ‘आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत पर्यटन मंत्री रोहन खवंटे आज माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारतीत सासष्टीतील लोकांसाठी उपलब्ध होते.

त्यांनी तालुक्यातील कित्येक जणांचे प्रश्र्न, कैफियती ऐकल्या व उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांना त्याचे निवारण करण्याचे आदेशही दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

सासष्टीतील मडगाव, कुंकळ्ळी, बाणावली, राशोल, नागोवा, कामुर्ली, नावेली परिसरातील लोकांनी सरकारी कामात जे अडथळे येत आहेत, त्याबाबत मंत्र्यांच्या माहिती दिली. यात प्रामुख्याने निवासी प्रमाणपत्र, जन्म दाखले, जागा संपादन, मोबाईल टॉवर, आपत्कालीन व्यवस्था, सरकारी योजना, कचरा, वृक्षतोड सारख्या विषयांचा समावेश होता.

Rohan Khaunte Interact With Public
पत्राद्वारे खंडणीची तक्रार बनावट असल्याचे स्पष्ट : अधीक्षक वाल्सन

या प्रसंगी आमदार आलेक्स सिक्वेरा, रेजिनाल्ड लॉरेन्स, वेन्झी व्हिएगश. क्रुझ सिल्वा, उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मडगावचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य परेश नाईक, उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई तसेच इतर खात्यातील अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मंत्री खवंटे यानी दामोदर साल, दामोदर तळी, दवर्ली तळीला भेट दिली.

कुठेही भेदभाव नाहीच!

सरकार उत्तर किंवा दक्षिण गोवा असा भेदभाव करीत नाही. दक्षिण गोव्यातही पर्यटनाला वाव देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कोलवा येथे स्पिरिट ऑफ फेस्टिवल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोलवा व परिसरातील किनारी भागांना साधन सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे खवंटे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com