Robbery: कॉंग्रेस उमेदवाराच्या कार्यालयात चोरी; विरोधकांवर निशाणा

कार्यालयात असलेले लॅपटॉप, मोबाईल आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत.
Robbery Congress Candidate Office at Cortalim
Robbery Congress Candidate Office at CortalimDainik Gomantak
Published on
Updated on

Robbery: गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष घरोघरी जाऊन आपला प्रचार करत आहे. त्याचबरोबर पक्षांकडून आपले उमेदवार जाहीर करणे, जनतेला वचने आणि आश्वासने देणे आणि विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करणे हेदेखील सुरू आहेच. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये यासाठी गोवा पोलिस (Goa Police) 24 तास सतर्क आहेत. तरीदेखील गुन्हा घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या कार्यालयावर चोरट्यांचा डोळा असतो. कुठाळ्ळीतील कॉंग्रेस उमेदवाराच्या (Congress candidate) कार्यालयात अश्याच अज्ञात व्यक्तींनी हात साफ केले आहेत.

Robbery Congress Candidate Office at Cortalim
Goa Election 2022: उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू

ओलेन्सियो सिमॉयस (Olencio Simoes) हे कुठाळ्ळीतील कॉंग्रेस उमेदवार असून त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी त्यांनी वेर्णा पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. यामध्ये कार्यालयात असलेले लॅपटॉप (Laptop Robbery), मोबाईल आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत.

Robbery Congress Candidate Office at Cortalim
Goa BJP: उत्पल यांनी पुन्हा भाजपत यावं

ओलेन्सियो सिमॉयस यांनी या प्रकाराबद्दल विरोधकांना दोषी मानले आहे. ते म्हणाले, 'कॉंग्रेस या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2022) जिंकणार असल्याची इतर पक्षांना भीती वाटत आहे, म्हणून त्यांनी हे असले प्रकार सुरू केले आहेत. पण मी जनतेला सांगू इच्छितो, की आम्ही इथे गुंडगिरी करायला आलेलो नाही, आम्हाला जनतेसाठी काम करायचे आहे. त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य पार पाडायला आलो आहोत. त्यामुळे विरोधकांना मी एवढेच सांगेन की लढायचे असेल तर खरेपणाने लढा, हे असले प्रकार करू नका.

कारण विरोधकांनी तसेच गावातील प्रश्न कधीच उचलून धरले नाहीत. विरोधकांना आता काँग्रेस पक्ष दीर्घकाळ प्रलंबित असलेले पाणी, वीज, कचरा, सांडपाणी यासारखी मूलभूत सुविधा बाबत प्रश्न काँग्रेस प्रश्न सोडवेल अशी त्यांनी त्यांना भीती वाटत असेल म्हणून त्यांनी असले कृत्य केले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मी वेर्णा पोलिसांना विनंती करतो की ताबडतोब या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करावी आणि गुन्हेगाराला शिक्षा द्यावी.' सिमॉयस यांचा हा टोला नेमका कुणासाठी होता हे मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान या चोरीप्रकरणी पोलिस अधिक तपासणी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com