म्हापसा मतदारसंघ हा या ना त्या कारणावरून चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघांमध्ये अनेक समस्या लोकांना उद्भवत आहेत. म्हापसा मतदारसंघातील खोदलेले रस्ते पावसापूर्वी व्यवस्थित करण्याचे आश्वासन आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी दिले होते. मात्र, त्याची पूर्तता त्यांना करता आलेली नाही.
पावसाच्या दिवसांमध्ये गटारांची अर्धवट कामे त्याचप्रमाणे वीज केबल घालण्यासाठी खोदलेले रस्ते डांबरीकरण न करता तसेच ठेवल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्यामुळे वाहनचालकांना ते दिसत नाहीत.
त्या खड्ड्यांमध्ये चार चाकींबरोबरच दुचाकी वाहनेही जातात आणि अपघात घडतात. त्यामुळे वाहनांची मोडतोड होते, त्याचबरोबर वाहनचालक व सहप्रवासीही जखमी होतात. तर काहीवेळा कोणाचातरी मृत्यूही होतो.
म्हापसा मतदारसंघात गटारे, रस्ते, वीज, पाणी आणि अशा इतर अनेक कामांच्या समस्या लोकांना उद्भवत आहेत आणि याकडे संबंधित खात्याचे अधिकारी व त्यांचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. या अधिकाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळेच ते निर्ढावल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
या मतदारसंघातील आमदार त्याचबरोबर म्हापसा नगरपालिका यांचे या विकासकामांकडे दुर्लक्ष झालेले आहे आणि त्यामुळे या समस्या लोकांना उद्भवत आहेत. त्यांचे जर लक्ष असते तर त्यांनी त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना व अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना त्या समस्या सोडवण्यासाठी सांगितले असते. म्हापसा हे उत्तर गोव्यातील महत्त्वाचे शहर असल्याने आमदार आणि राज्य सरकारने येथील समस्या सोडवण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे; परंतु त्याकडे ते दुर्लक्ष का करतात, हा असा प्रश्न आहे.
म्हापसा मतदारसंघातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत. गटारांची दुरवस्था झालेली आहे व इतर समस्या उद्भवलेल्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे. रस्त्यांची दुर्दशा होण्याचे कारण म्हणजे वीज केबल घालण्याचे काम संथगतीने झाले आणि ते पाऊस सुरू झाला तरी संपलेले नाही. अजूनही सुरू आहे. टप्प्याटप्प्याने येथील रस्त्यांची, गटारांची झालेली दुरवस्था व्यवस्थित करण्यात येईल.
म्हापसा मतदारसंघातील सर्व रस्ते विविध प्रकारच्या भूमिगत वाहिन्या घालतेवेळी खोदण्यात आले होते आणि ते पावसापूर्वी हॉटमिक्स करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले होते. परंतु पाऊस सुरू झाला तरी ते रस्ते हॉटमिक्स केलेले नाहीत. त्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून राहते. या खड्ड्यांमध्ये वाहने जाऊन अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
बुधवार २६ रोजी रात्री मुसळधार पाऊस पडत असताना ११ वाजण्याच्या दरम्यान मारुती मंदिरच्या मागच्या बाजूला एक इमारत वजा घर होते त्याचा पुढचा भाग कोसळला आणि आता जो भाग राहिलेला आहे तोही कोसळण्याच्या मार्गावर आहे.
अनेक जुनाट इमारतींचे मालक राहतात विदेशात
१)म्हापसा शहरात सध्या जुन्या इमारतींची वाताहात झालेली आहे. अनेक घरे व इमारती आहेत त्यांचे मालक विदेशामध्ये आहेत. या इमारती व जुनी घरे कुणाची आहेत हे कुणाला माहीत नाही. जुन्या आझिलो इस्पितळाजवळ त्याचबरोबर राजवाडा तसेच खोर्ली-म्हापसा अशा ठिकाणी ही घरे आहेत.
२) म्हापशामध्ये एक जुनी अशी मोठी या इमारत आहे आणि त्या इमारतीच्या खाली दुकाने व पूर्वी सिंडिकेट बँक होती आता त्या ठिकाणी सेंट्रल बँक झालेली आहे. या बँकेच्या खाली अनेक मजूर उभे असतात किंवा रात्रीच्या वेळी झोपलेलेही असतात आणि त्यामुळे ही इमारत कधी पडेल याचा नेम नाही.
३) म्हापशातील डॉ. राम मनोहर लोहिया गार्डनजवळ एक मोठी इमारत असून या इमारतीमध्ये अनेक फ्लॅट होते आणि त्या फ्लॅटधारकांनी ही इमारत मोडकळीस आल्याने आपले बस्थान दुसरीकडे वळविलेले आहे आणि या इमारतीमधील हा जो स्लॅब आहे तो हळूहळू पडत आहे.
४) गेल्याच पंधरा दिवसांपूर्वी येथील बुर्ये पेट्रोल पंपजवळ असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळून त्याखाली उभी करून ठेवलेली दोन चारचाकी वाहने व तीन दुचाकी वाहने मोडून लाखो रुपयांचे नुकसान झालेले होते तर यात एकजण किरकोळ जखमीही झालेला होता. अशा घटना म्हापसा शहरामध्ये सध्या घडत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.