Water Problem: पाण्यासाठी महिला एकवटल्या; टँकरमधून पुरवठ्याची मागणी

Water Problem: साकोर्डा पंचायत कार्यालयावर धडक
Water Problem
Water ProblemDainik Gomantak

Water Problem:

पेयजलासाठी निर्माण झालेल्या समस्यांमुळे संतप्त महिलांनी एकत्र येत मंगळवारी (ता.२६) सकाळी साकोर्डा पंचायत कार्यालयावर धडक दिली. मात्र, यावेळी सरपंच प्रिया खांडेपारकर कार्यालयात उपस्थित नसल्याने आक्रमक महिलांनी धारबांदोडा येथील पाणी विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन साहाय्यक अभियंत्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली.

डोंगरवाडा-साकोर्डा येथील सार्वजनिक विहिरीला जोडलेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचा पंप सकाळी केवळ 10 मिनिटे चालतो, त्यानंतर विहिरीचे संपूर्ण पाणी आटते व पंप बंद पडतो. त्यामुळे डोंगरवाड्यातील सुमारे 80-90 लोकांना पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागते.

लोकांना पाणीपुरवठा करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. हे विसरून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याचे कारण सांगून महिलांना परतवून लावले, हे अशोभनीय आहे, असे काही महिलांनी सांगितले.

Water Problem
Illegal Liquor: मडगावात 170 लिटर अवैध दारू पकडली

डोंगरवाड्यात विहिरीव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने तेथील लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक वर्षी मार्च महिन्यापासून या गावात पाण्याची समस्या उद्भवत असते.

याची संपूर्ण कल्पना धारबांदोडा पाणी विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना असूनही ते निष्क्रिय बनले असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांत व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळी महिलांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली.

Water Problem
Lok Sabha Election: पल्‍लवींना विजयी करण्‍यासाठी जीवाचे रान करू

अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे

साकोर्डा पंचायत क्षेत्रातील डोंगरवाडा येथील लोकांना टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धारबांदोडा येथील पाणी विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांना सूचना केल्या होत्या. आठवडा होत आला तरीही पाण्याच्या टँकरचा पत्ता नाही.

दोन दिवसांत टँकर पाठवतो, असे वारंवार सागण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावे, असे साकोर्ड्याच्या सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com