Ponda Crime: फोंड्यातील निरंकाल भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी तो पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. गवळवाडा, शिगणेव्हाळ, मायणे, कोनसे, सातेरीमळ व अन्य भागात बिबट्याचा संचार असून वन खात्याने त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या रात्रीच्या वेळी पाळीव प्राण्यांची विशेषतः कुत्र्याची शिकार करत आहे. वरील परिसरातील घरांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात कुत्रे पाळतात. चोरांपासून सुरक्षित राहता यावे यासाठी लोक घराघरांत दोन-तीनपेक्षा अधिक कुत्रे पाळतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून या पाळीव कुत्र्यांची शिकार बिबट्या करत असल्याने लोकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी काही वाहनचालकांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे.
दरम्यान, वन खात्याने परिसरात सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काल सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गवळवाडा येथील पास्कोल रॉड्रिगीस यांच्या घरातील पाळीव कुत्रा बिबट्याने पळवून नेला. काही दिवसांपूर्वी अन्य एका कुत्र्याचा फडशा पाडला होता. जवळपास घरे नसल्याने पास्कोल यांनी दोन कुत्रे पाळले होते. पण त्या दोन्ही पाळीव कुत्र्यांची बिबट्याने शिकार केल्याने आता या कुटुंबातील लोकांच्या जीवालाच धोका निर्माण झाला आहे. कारण हा बिबट्या कधीही माणसावरही हल्ला करू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.