Margao: धक्कादायक! PWD इंजिनिअरच्या पायावरून चालवला रोड रोलर

रोड रोलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Road Roller
Road Roller Dainik Gomantak

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका कनिष्ठ अभियंत्याच्या (PWD Junior Engineer) पायावरून रोड रोलर मशीन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोडके बाळ्ळी येथे शुक्रवार, 20 जानेवारी रोजी ही घडली.

दयानंद फळदेसाई (59) असे या अभियंत्याचे नाव आहे. फळदेसाई यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

Road Roller
Mapusa Cylinder Blast Video: म्हापसा येथील हिलटॉप बारमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, 2 लाखांचे नुकसान

याप्रकरणी रोड रोलर चालक आंतोनियो फर्नांडिस याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित फर्नांडिस हा रोड रोलर मशीनचा ऑपरेटर असून, त्याने निष्काळजीपणे रोड रोलर फळदेसाई यांच्या उजव्या पायावर चलविला. शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता येथील घोडके बाळ्ळी येथील रेल्वेगेटजवळ ही घटना घडली.

Road Roller
Indo French naval exercise Varuna:भारत फ्रेंच नौदलाचा मुरगाव बंदरात सराव, पाहा सरावाचे खास फोटो

कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात (Cuncolim Police Station) याप्रकरणी आंतोनियो फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणू पागी हे पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com