Mapusa Road work
Mapusa Road work Dainik Gomantak

Mapusa News: म्हापशातील रस्ते पूर्ववत करण्याच्या कामाला सुरुवात; उपसभापतींच्या हस्ते उद्घाटन

या कामास गणेशपुरीमधून सुरवात झाली असून, ७.५कोटी रुपये खर्चाचे काम हे चार प्रभागांत विभागले आहे
Published on

उपसभापती तथा म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा शहरातील रस्ते पूर्ववत (पुनर्स्थापन) करण्याच्या कामाचे उद्घाटन शुक्रवारी केले. या कामास गणेशपुरीमधून सुरवात झाली असून, ७.५कोटी रुपये खर्चाचे काम हे चार प्रभागांत विभागले आहे. डिसोझा म्हणाले की, पुनर्स्थापनेचे काम दोन कंत्राटदारामार्फत केले जाईल.

Mapusa Road work
Goa Updates 02 December 2023: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

गेल्या दीड वर्षांत म्हापसा येथे भूमिगत केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आलेले. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने स्थानिक रहिवाशांना दररोज गैरसोय व त्रास सहन करावा लागायचा. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या रस्त्यांवरील भूमिगतचे काम पूर्ण झाले आहे, ते रस्ते पूर्ववत करण्याची मागणी स्थानिकांकडून वेळोवेळी केली जात होती.

त्यानुसार, शुक्रवारी आमदार जोशुआ डिसोझा, म्हापसा पालिका नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर, साबांखा अधिकारी यांच्या उपस्थितीत उच्च व लो-टेन्शन ओव्हरहेड फीडरचे भूमिगत केबलिंगमध्ये रुपांतर करण्यासाठी वीज विभागाने खोदलेल्या विविध अंतर्गत रस्त्यांच्या पुनर्स्थापनच्या कामाला सुरवात झाली.

आमदार जोशुआ म्हणाले की, रस्ते पूर्ववत करण्याचा शब्द मी पाळला आहे. अंदाजे ७.५कोटी खर्चून रस्ते पूर्ववत करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. मध्यंतरी लोकांची खूप गैरसोय झाली होती व अनेकांनी तक्रारही केल्या होत्या.

मात्र, लोकांनी कळ सोसल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. रस्ते पूर्ववत करण्याचे काम हे प्रभाग क्र.६मधील गणेशपुरीचा परिसर, प्रभाग क्र.१२, प्रभाग क्र. १६ व प्रभाग क्र. १५मधील रस्त्यांचाही समावेश आहे. याशिवया पुढच्या टप्प्यात बहुतांश रस्ते केले जातील, असेही डिसोझा म्हणाले.

नगराध्यक्षा प्रिया मिशाळ व नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामावेळी लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com