

Vasco : वास्कोतील हिरालाल ठक्कर हाऊसजवळ रस्ता खचून चिऱ्यांनी भरलेला ट्रक रुतला. गेल्या दोन महिन्यांपासून वास्कोत रस्ता खचण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिक आणि वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी संध्याकाळी वास्कोतील हिरालाल ठक्कर हाऊसजवळ रस्ता अचानक खचण्याचा प्रकार घडला. यावेळी जीए 01 टी 9257 या क्रमांकाचा ट्रक चर्च स्क्वेअरकडे जात असताना हिरालाल ठक्कर हाऊसजवळ रस्ता खचल्यानंतर तो डाव्या बाजूला झुकला. या घटनेमुळे गोव्यातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
ट्रकचे मागचे टायर रस्त्याच्या कडेला खचलेल्या भागात गेले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंतर ट्रक क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यातून वर काढण्यात आला. मात्र रस्ता खचून ट्रक अडकल्याने काहीकाळ वाहतुकीचाही खोळंबा झाला. वास्कोकरांना या कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी गिरी म्हापसा सर्व्हिस रोडला भल मोठ्ठं भगदाड पडले होतं. पाण्याच्या प्रवाहामुळे हा रस्ता खचला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या भगदाडामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती, जी काही दिवसांपूर्वीच पूर्ववत करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.