Goa Rain: साकवाच्या जागी पूल उभारा! नागरिकांची मागणी

Mapusa Chandel Road: कासारवर्णेत मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी
Mapusa Chandel Road: कासारवर्णेत मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी
Casarvarnem Flood Dainik Gomantaj
Published on
Updated on

कासारवर्णे येथील म्हापसा ते चांदेल मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येते. सध्या या मार्गावरील वाहनांची ये-जा पूर्णत: बंद झाल्याने शाळकरी मुले आणि कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

चांदेल येथे पाण्याची मुख्य वाहिनी आहे. या मार्गावरील साकवातून पावसाचे पाणी वाहते. मात्र, या साकवाच्या तोंडावर लाकडे, काठ्या, कचरा अडकून राहिल्यामुळे पाणी साचून रस्त्यावरून जाते.

आता तर मोपा विमानतळावरील पाणीही कासारवर्णेत येत असल्यामुळे डोंगरावरील दगड-धोंडे मोठ्या प्रमाणात शेतात वाहून येतात. त्यामुळे शेती करणेही अशक्य झाले आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या साकवाच्या जागी नवीन पूल उभारावा आणि त्या रस्त्याला एक मीटर उंची देऊन भविष्यात पाण्याची होणारी समस्या टाळावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून केली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर या जागी नवीन पूल उभारावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Mapusa Chandel Road: कासारवर्णेत मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी
Chandel Bridge : चांदेल येथील मिनी पूल धोकादायक

रस्त्याची उंची वाढवा

कासारवर्णेतील हा रस्ता कमीत कमी एक किलोमीटर लांबीपर्यंत उंच करावा. येथील रस्त्याच्या मध्ये असलेली जुनी जलवाहिनी काढून मोठ्या आणि उंच पुलाचे काम करावे, अशी मागणी माजी सरपंच नवनाथ नाईक, पंच वृषाली नाईक, मोहिनी नाईक, अनिता नार्वेकर, सुनीता नाईक, जयश्री सावंत, प्रेरणा गाड, सुनीता सावंत, श्रद्धा सावंत आदींनी केली आहे.

Mapusa Chandel Road: कासारवर्णेत मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी
Goa Rain: राजधानीत विक्रमी पाऊस! पणजी जलमय

जलवाहिनी स्थलांतरित करणे गरजेचे

विद्यमान साकवाजवळून चांदेल ते कासारवर्णे प्रकल्पाची जलवाहिनी जाते. ही जलवाहिनीही साकवातील पाण्यास अडथळा ठरत आहे. त्यामुळे चांदेल जल प्रकल्पाची ही वाहिनी सुरक्षितस्थळी हलवून उपाययोजना करावी, अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com