Goa To Belgaum: चोर्लामार्गे बेळगाव जाणाऱ्यांसाठी नवी अपडेट! पाण्याच्या प्रवाहाने खचला रस्ता; पर्यायी मार्ग जाणून घ्या

Goa Belgaum Road: खानापूर तालुक्यातील कुसमुळी येथील मलप्रभा नदीवर नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे.
Goa Belgaum Road
Goa Belgaum Jamboti RoadDainik Gomantak
Published on
Updated on

खानापूर: खानापूर तालुक्यातील कुसमुळी येथील मलप्रभा नदीवर नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. रविवारी बेळगावहून गोव्याकडे येणाऱ्या वाहनचालकांना अडचण झाली.

त्यामुळे कुसमळीहून पुन्हा बेळगाव-खानापूर-जांबोटी असा प्रवास करावा लागला. त्यामुळे १५ ते २५ कि. मी.चे अधिक अंतर कापावे लागले. उद्यापासून गोव्याहून चोर्लामार्गे बेळगावला जाणाऱ्यांना जांबोटी- खानापूरमार्गे बेळगावला जावे लागणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुलावर ज्यादा पाईप घालून पर्यायी रस्ता पुन्हा चालू करण्यात आला होता. मात्र, रविवारी (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास पर्यायी रस्ता पुन्हा पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने बेळगाव-कुसमली-जांबोटी - चोर्ला-गोवा अशी वाहतूक रविवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे.

Goa Belgaum Road
Goa Belgaum Road: चोर्लाघाट-बेळगाव रस्त्याबाबत मोठी अपडेट; या मार्गावरुन प्रवास करण्यापूर्वी बातमी वाचा

सध्या दुचाकीसह सर्व वाहतुकींना निर्बंध घालण्यात आले आहेत. मे महिन्यातील वळीव पावसामुळे मलप्रभा नदीच्या जलप्रवाहात वाढ झाल्याने भराव ढासळत आहे. तोराळी, व आमटे येथील मलप्रभा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने पाण्याचा प्रवाहात वाढ झाली. त्यामुळे आता दुसऱ्यांदा पर्यायी रस्ता बंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com