देशात सध्या कोरोना महामारीमूळे हजारो लोकांचे जीव जाताना दिसता आहेत. मात्र आकडेवारीचा विचार केल्यास कोरोना विषाणुपेक्षा रस्ते अपघात जास्त धोकादायक असल्याचे दिसुन येते आहे. रस्ते अपघाताबाबत सरकारने संसदेत माहिती दिली. 2019 मध्ये भारतात एकूण 449002 रस्ते अपघात झाले आणि त्यात 1,51,113 मृत्यू झाले. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अनेक कारणांमुळे रस्ते अपघात होत आहेत. जसे की वेगात वाहन चालवणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, चुकीच्या लेनवर वाहन चालविणे नियमांचे पालन न करणे, मोटार वाहन चालकांच्या चुका, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर गोष्टींमुळे हे अपघात होत असतात. तरी देशातील रस्ते अपघात दरवर्षी कमी होताना दिसताना आहेत. (Road Accidents is Dangerous than Covid19)
2018 मध्ये झाले होते 467044 रस्ते अपघात.
2018 मध्ये 467044 रस्ते अपघात झाले होते तर, मृत्यूची संख्या 151417 एवढी होती. गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, स्वयंसेवी संस्था इत्यादी माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाने रस्ता सुरक्षाविषयक प्रचारात्मक उपाय आणि जनजागृती मोहीम राबविण्याची योजना तयार केली आहे.
अपघातप्रवणस्थळ/ Black Spot
केंद्रीयमंत्र्यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट ओळखुन त्याठीकाणचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गडकरी म्हणाले की, मोटार वाहनांच्या सुरक्षेची मानके सुधारण्यात आली आहेत आणि मंत्रालयाने सर्व वाहतूक वाहनांवर वेग मर्यादा सुनिश्चित करणारे उपकरणे बसविण्याची अधिसूचना जारी केली आहे.
हिट अँड रनमध्ये दिल्लीत 536 लोकांचा मृत्यू
दुसर्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, 2019 मध्ये दिल्लीत 'हिट अँड रन' प्रकारात 536 लोक ठार आणि 1,655 जखमी झाले. तर एका दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गालगत असलेली दारूची दुकाने हा राज्याचा विषय असल्याने त्याबदद्लची माहिती केंद्र सरकार गोळा करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व्हिस लेनपासून 500 मीटरच्या अंतरामध्ये मद्य विक्रीसाठी परवाने देण्यास बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.