Masur Dal Price: दाळ स्वस्त करण्यासठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

अमेरिका व्यतिरिक्त इतर देशांकडून आयात केलेल्या मसूर दाळीवरील आयात शुल्क रद्द करण्यात आलेला आहे.
Union Minister of Finance: Nirmala Sitharaman
Union Minister of Finance: Nirmala Sitharaman Dainik Gomantak
Published on
Updated on

मसूर दाल किंमत: डाळीचे दर आणि घरगुती पुरवठ्यावर नियंत्रण या गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सरकारने मसूरवरील आयात दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कृषी पायाभूत सुविधा विकास उपकरातही घट केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत याबाबत अधिसूचना सादर केली. (Central government has reduced the custom duty on Masur Dal)

अमेरिका व्यतिरिक्त इतर देशांकडून आयात केलेल्या मसूर दाळीवरील आयात शुल्क काढून टाकण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अमेरिकेतून येणाऱ्या मसूर दाळीवरील आयात शुल्कही कमी करण्यात आले आहे. यापूर्वी अमेरिकेतून डाळींच्या आयातीवरील आयात शुल्क 30 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. त्याशिवाय कृषी पायाभूत सुविधा विकास उपकरातही दहा टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मते, 1 एप्रिलच्या तुलनेत किरकोळ बाजारात मसूर डाळीच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 1 एप्रिल रोजी किरकोळ बाजारात 1 किलो मसूर डाळची किंमत 70 रुपये होती, आता ती 100 रुपयांवर गेली आहे. इंडिया ग्रेन्स अ‍ॅड पल्सेस असोसिएशनचे उपाध्यक्ष बिमल कठोरी यांनी सांगितले की, “भारताला वर्षाकाठी 2.4 करोड टन डाळींची आवश्यकता असते. परंतु यावर्षी आम्ही हा दर कमी होईल अशी अपेक्षा करतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com