Goa Accident: अखेर 'त्या' निष्काळजी चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! स्टँड फोडून, अष्टमीच्या फेरीत घुसली बस
पणजी: काही दिवसांपूर्वी पणजीतील मासळी मार्केटजवळ एका बसने केलेल्या भीषण अपघातात चार जण जखमी झाले. तसेच, या अपघातात एक बस स्टॉप आणि फेरीच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. २३ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव आणि निष्काळजीपणे बस चालवल्याच्या आरोपाखाली सय्यद एस. नजमुद्दीन (वय ५७) याला पणजी पोलिसांनी अटक केली आहे.
नियंत्रण सुटल्याने घडला अपघात
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस पणजी मार्केटच्या विरुद्ध दिशेने असलेल्या स्मार्ट सिटी बस स्टॉपजवळ पोहोचल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने जोरदार धडक दिली आणि बस स्टॉप पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
तसेच, पुढे जाऊन बस अष्टमीनिमित्त भरलेल्या फेरीमध्ये घुसली. त्यामुळे फेरीतील अनेक दुकानांचेही मोठे नुकसान झाले. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत, ज्यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बसचालक ताब्यात
या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि पणजी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि मदतकार्य सुरू केले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी बसचालक सय्यद एस. नजमुद्दीन याला ताब्यात घेतले आहे. जर बस बस स्टॉप आणि सिमेंटच्या खांबाला धडकून थांबली नसती, तर आणखी मोठा अनर्थ घडला असता, असेही स्थानिक नागरिकांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

