BITS Pilani: ‘बिटस पिलानी’त फुड पॅकेटमध्ये सापडली सिगारेट! पार्सलची तपासणी सुरू; डिलिव्हरी कंपनीला सक्त इशारा

BITS Pilani Student Death: ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाल्याच्या निष्कर्षानंतर या आठवड्यात बिटस पिलानी कॅम्पसमध्ये येणाऱ्या पार्सलची तपासणी सुरू केली आहे.
Student safety in BITS Pilani campus | Judicial inquiry demand BITS Pilani
BITS Pilani Campus GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाल्याच्या निष्कर्षानंतर या आठवड्यात बिटस पिलानी कॅम्पसमध्ये येणाऱ्या पार्सलची तपासणी सुरू केली आहे.

गुरुवारी पोलिसांना फुड पॅकेटमध्ये सिगारेटचे पॅकेट आढळल्यामुळे ती ऑर्डर पोलिसांनी रद्द केली आणि ते फुड पॅकेट नष्ट केले. तसेच संबंधित डिलिव्हरी कंपनीला सक्त इशाराही दिला.

Student safety in BITS Pilani campus | Judicial inquiry demand BITS Pilani
Bits Pilani: ऋषी नायरला ड्रग्स कुठून मिळाले? त्याच्या खोलीत कोण आले होते? 'बिट्स पिलानी'तील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

या प्रकारानंतर डीआयजी वर्षा शर्मा आणि दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅम्पसला भेट दिली. वसतिगृहाच्या रचनेचा त्यांनी आढावा घेतला आणि सर्व प्रवेशद्वारांवर कडक तपासणी करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, बिट्स पिलानीने आता पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे.

Student safety in BITS Pilani campus | Judicial inquiry demand BITS Pilani
Bits Pilani: गोवा बनतेय ‘ड्रग्‍सची राजधानी’! बिट्स पिलानीवरून चिंता व्यक्त; इतर महाविद्यालयांतही तपासणीची मागणी

कॅम्पसमध्ये बसविले ६०० कॅमेरे

ऋषी नायर याच्या मृत्युनंतर बिट्स पिलानी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत अभूतपूर्व बदल करण्यात आला आहे. सर्व पार्सल तपासण्यासाठी वेर्णा पोलिसांना कॅम्पसच्या प्रवेशद्वारांवर तैनात केले आहे तसेच संस्थेने त्यांची वसतिगृहे आणि इतर भागात सुमारे ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com