Bits Pilani: गोवा बनतेय ‘ड्रग्‍सची राजधानी’! बिट्स पिलानीवरून चिंता व्यक्त; इतर महाविद्यालयांतही तपासणीची मागणी

Bits Pilani Drugs: गोव्याला आता भारताची ‘ड्रग्‍सची राजधानी’ म्हटले जात आहे आणि सरकार या संकटाकडे दुर्लक्ष करत राहिले तर युवापिढी वाया जाण्‍याची भीती अधिक आहे, असे खलप म्‍हणाल्‍या.
Bits Pilani Drugs
Bits Pilani Death CasesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बिट्स पिलानीमध्ये मृत सापडलेल्‍या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्‍या शरीरात ड्रग्‍स सापडणे ही धोकादायक गोष्‍ट आहे. हा धोका फक्त बिट्स पिलानीपुरता मर्यादित नाही तर इतर महाविद्यालयांपर्यंत पसरला असण्याची दाट शक्यता आहे. पूर्वी समाजातील संकट म्हणून आपण ज्या गोष्टीकडे पाहत होतो, ते आता आपल्या शैक्षणिक संकुलापर्यंत पोहोचले आहे, अशा शब्‍दांत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांनी चिंता व्‍यक्त केली आहे.

सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हा धोका फक्त बिट्स पिलानीपुरता मर्यादित नाही तर इतर महाविद्यालयांपर्यंत पसरला असण्याची दाट शक्यता आहे. गोव्याला आता भारताची ‘ड्रग्‍सची राजधानी’ म्हटले जात आहे आणि सरकार या संकटाकडे दुर्लक्ष करत राहिले तर युवापिढी वाया जाण्‍याची भीती अधिक आहे, असे खलप म्‍हणाल्‍या.

सर्व शैक्षणिक संकुलांची काटेकोर तपासणी करणे गरजेचे आहे. अचानक छापे, वसतिगृहे, कँटीन, विक्रेते आणि महाविद्यालयांच्या आसपासच्या कॉफी शॉप्सवर स्टिंग ऑपरेशन्स राबवावीत, असेही खलप यांनी सांगितले. बिट्स पिलानी प्रशासनावर टीका करताना त्‍या म्‍हणाल्‍या की, पालकांना सीसीटीव्ही फुटेज न देणे यातून तेथे काय चालले आहे याची जाणीव होते.

ड्रग्‍‍सप्रकरणात गुंतलेल्‍या एका विद्यार्थ्याचे केले होते निलंबन

बिट्स पिलानीच्‍या विद्यार्थ्यांना कॅम्‍पसमध्‍ये जाऊन ड्रग्‍स पुरवल्‍याची एक घटना गतवर्षी उघडकीस आली होती. शिवाय त्‍या प्रकरणात गुंतलेल्‍या एका विद्यार्थ्याला कायमचे निलंबितही करण्‍यात आले होते, अशी माहिती बिट्स पिलानीच्‍या सूत्रांनी गुरुवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

काही दिवसांपूर्वी कॅम्‍पसमध्‍ये मृतदेह आढळून आलेल्‍या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्‍या उलटीत तीन प्रकारचे ड्रग्‍स आढळून आल्‍याने कॅम्‍पसमध्‍ये ड्रग्‍स पोहोचत असल्‍याच्‍या संशयाला आणखी बळकटी मिळाली.

शैक्षणिक संस्‍थेत ड्रग्‍स पोहोचलेच कसे?

बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये मृत आढळलेल्‍या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या शरीरात तीन प्रकारचे ड्रग्स सापडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या कॅम्पसमध्ये ड्रग्स पोहोचलेच कसे? असा सवाल वेळ्‍ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी उपस्‍थित करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.

सिल्वा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्‍हटले आहे की, या घटनेने विद्यार्थी आणि त्‍यांची सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. एका बाजूने या कॅम्पसमध्ये शिकणारे विद्यार्थी ड्रग्सचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट सांगत असताना बिट्स पिलानीचे व्यवस्थापन मात्र कानावर हात ठेवत आहे. ड्रग्सचे नेटवर्क संपवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून सखोल तपास होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार येथे विद्यार्थी सुरक्षेची अंमलबजावणी होते का, याची तपासणी केली जावी.

‘एसआयटी’ स्‍थापन करून मुळाशी जा

१बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्युप्रकरणी आता ड्रग्‍ससेवनाचे कारण पुढे आले आहे. ही गंभीर बाब असून संपूर्ण कुठ्ठाळी मतदारसंघच ड्रग्सचे हब बनले आहे.

२ फक्त बिट्स पिलानीच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील शैक्षणिक संस्थांच्या आवारात ड्रग्स पोहोचले असून विद्यार्थी त्याचे शिकार बनत आहेत.

३ ही विषवल्ली ठेचून टाकण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तातडीने एसआयटी स्‍थापन करा, अशी मागणी एनएसयूआयचे गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केली आहे.

कुठ्ठाळी बनतेय ‘ड्रग्ज हब’

बिट्स पिलानी या शैक्षणिक संस्‍थेतील मृत विद्यार्थ्याच्‍या शरीरात ड्रग्‍स सापडणे ही खरोखरच धोकादायक बाब आहे. कुठ्ठाळी मतदारसंघातील लोकांसाठी हा एक गंभीर इशाराच आहे. हा मतदारसंघ ‘ड्रग्ज हब’ बनत चालला आहे, असे काँग्रेस नेते ओलेन्सियो सिमॉईस यांनी म्हटले आहे.

पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू हा योगायोग नव्हेत, तर पुढील मोठ्या संकटाची चाहूल आहे. विद्यार्थ्यांना ड्रग्‍सचा पुरवठा करण्‍यामागे रॅकेट आहे. वरवरच्या चौकशीने हा प्रश्‍‍न सुटणार नाही. या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी, शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले ड्रग्‍सचे नेटवर्क मोडून काढण्‍यासाठी, गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची गरज आहे, असे सिमॉईस यांनी म्‍हटले आहे.

Bits Pilani Drugs
Bits Pilani: बंदी असलेले ‘सिंथेटिक्‍स ड्रग्‍स’ मिळाले कसे? बिट्स कॅम्‍पसमध्‍ये पोलिस तैनात; ‘स्‍विगी बॉईज्‌’वर संशयाची सुई

उलटीची चाचणी केलेल्‍या‘रँडॉक्‍स’ यंत्राबाबत

रँडॉक्स ही इंग्‍लंडमधील कंपनी असून, ती वैद्यकीय आणि प्रयोगशाळांतील उपकरणे बनवते. अशा उपकरणांपैकी मानवी रक्त आणि शरीरातील द्रव नमुन्यांमधून अंमलीपदार्थांचा शोध घेणारे यंत्र.

गोमेकॉतील न्‍यायवैद्यक विभागाने २०१४ मध्ये ‘फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर’ या नावाने हे यंत्र तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पाठिंब्याने नवीन फॉरेन्सिक कॉम्प्लेक्सच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून मिळविले.

तत्कालीन फौजदारी प्रक्रिया संहितेमुळे (सीआरपीसी) न्यायालयात पोलिसांच्या या तंत्रज्ञानावर आधारित अहवालांची स्वीकारर्हता प्रश्‍‍नचिन्‍हात होती.

‘सीआरपीसी’ची जागा भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने (बीएनएनएस) घेतल्‍यापासून फॉरेन्सिक तज्‍ज्ञांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या प्रयोगशाळेतील अहवालांचा वापर करण्यास परवानगी मिळाली आहे.

Bits Pilani Drugs
BITS Pilani विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; उलटीत सापडले तीन प्रकारचे ड्रग्ज, घटनेचे गूढ वाढले

सप्टेंबर २०२४ मध्ये ‘रँडॉक्स’ कंपनीच्या बायबॅक धोरणाअंतर्गत जुन्‍या यंत्राची जागा ‘मल्‍टिस्टॅट’ नावाच्या नवीन यंत्राने घेतली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्‍पितळ आणि गोवा राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा अशा दोन ठिकाणी दोन यंत्रे खरेदी करण्‍याच्‍या प्रयत्‍नात राज्‍य सरकार आहे.

मल्‍टिस्टॅट रँडॉक्स यंत्रात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाला ‘बायोचिप इम्युनोअसे’ तंत्रज्ञान म्हणतात. सध्या या तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारची सुमारे २९ औषधे शोधता येतात.

सदर यंत्र रुग्णालयाच्या प्रयोगशाळांमध्ये स्थापित केले जाऊ शकते आणि ते जलद वेळेत निकाल देते. त्‍यामुळे त्‍यास मागणी वाढत चालली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com