Borim: 5 वर्षांपूर्वी नेपाळी युवतीचा खून, प्रेमीयुगुलांच्‍या फेऱ्या, केरकचरा! बायथाखोल-बोरी डोंगर परिसरातील रस्ता बंद करण्‍याची मागणी

Baytakol Borim: बोरी बायथाखोलच्या डोंगरमाथ्यावर जी पाण्याची मोठी टाकी बांधलेली आहे, त्‍या टाकीद्वारे बोरी गावातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
Baytakol Borim
Baytakol HillDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: बायथाखोल बोरीच्या डोंगरमाथ्यावरील पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता गेट लावून बंद केला जाणार असल्याची घोषणा करून पाच वर्षे लोटली. परंतु अद्याप हा रस्ता मोकळाच ठेवला गेल्याने तेथे केरकचरा टाकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. प्रेमीयुगुलांचा ओढाही तिकडे वाढला आहे.

बोरी बायथाखोलच्या डोंगरमाथ्यावर जी पाण्याची मोठी टाकी बांधलेली आहे, त्‍या टाकीद्वारे बोरी गावातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या रस्त्याने पाणी खात्याचे आणि वीज खात्याचेच कर्मचारी ये-जा करत असतात.

दुसरीकडे हा टाकीचा परिसर प्रेमीयुगुलांचे आकर्षण ठरला असून तेथे गैरकृत्‍ये होऊ लागली आहेत. दरम्‍यान, या अंतर्गत रस्त्याजवळ काही लोक कचरा आणून बिनधास्तपणे टाकतात. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे.

Baytakol Borim
Mhadei Sanctuary: म्हादई अभयारण्याला गैरप्रकारांचा विळखा! बसवेश्वर मंदिरात तोडफोड, आगीच्या घटना; कडक कारवाईची होतेय मागणी

या टाकीकडे पुन्हा अनुचित प्रकार घडू नये म्हणून संबंधित खात्यांनी रस्त्याच्या सुरवातीलाच गेट बसवून कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य लोकांना जाण्यास व वाहने नेण्यास निर्बंध घालावेत, जेणेकरून संभाव्य धोके टळतील, अशी मागणी होऊ लागली आहे.

Baytakol Borim
Old Borim Bridge: 200 वर्षांपूर्वीचा पूल, पोर्तुगीजांनी बॉम्बने उडवला होता भाग; जुन्या आठवणींना देतोय उजाळा

पाच वर्षांपूर्वी झाला होता नेपाळी युवतीचा खून

या निर्जन ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीला लागून कर्मचाऱ्याला राहण्यासाठी छोटी खोली आहे. या खोलीत काही अज्ञात व्यक्ती येऊन बसतात. पाच वर्षांपूर्वी एका नेपाळी युवतीचा या खोलीत खून झाला होता. तेव्हा या ठिकाणी आलेले पोलिस तसेच अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी या टाकीकडे गैरप्रकार घडू नयेत म्हणून बोरी-फोंडाच्या हमरस्त्याला लागून असलेल्या रस्त्यावर गेट बसवून संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी आणि वाहने नेण्यासाठी रस्ता खुला केला जाईल असे सांगितले गेले होते. परंतु अजून त्‍याची पूर्तता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com