Shavina Shirodkar Controversy: शविना शिरोडकर प्रकरण तापले! माफीवरून वाद कायम; अजय खोलकरांविरोधात केपे पोलिसांत तक्रार

RGP Criticism Against Ajay Kholkar: खोलकर यांच्‍याकडून चूक झाली, तेव्हा संबंधित युवतीने त्‍यांना माफी मागण्याची संधी दिली. तरीही आपली चूक मान्य करण्याऐवजी खोलकर यांनी, आपल्‍याला आपण काहीही चुकीचे केल्यासारखे वाटत नाही.
RGP Criticism Against Ajay Kholkar
Shavina Shirodkar ControversyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाच्‍या (आरजी) प्रदेशाध्‍यक्ष शविना शिरोडकर यांच्‍याबाबत आक्षेपार्ह वक्तव्‍ये करणारे अजय खोलकर बचावासाठी आपण आदिवासी असल्‍याच्‍या ओळखीचा वापर करीत असून, हा प्रकार दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, असे ‘आरजी’च्‍या उत्तर गोवा समितीचे अतिरिक्त सचिव तुषार गावस यांनी जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

खोलकर यांच्‍याकडून चूक झाली, तेव्हा संबंधित युवतीने त्‍यांना माफी मागण्याची संधी दिली. तरीही आपली चूक मान्य करण्याऐवजी खोलकर यांनी, आपल्‍याला आपण काहीही चुकीचे केल्यासारखे वाटत नाही. तरीही जर कोणाच्या भावना दुखावल्याच असतील, तरच माफी मागतो, असे सांगितले. यातून त्‍यांनी ही माफी प्रामाणिकपणे मागितली नाही हेच दिसून येते. आता स्‍वत:चा बचाव करण्‍यासाठी ते आपण आदिवासी असल्‍याची ओळख दाखवत आहेत. हा प्रकार निंदनीय आणि निषेधार्ह आहे, असे गावस यांनी पत्रकात म्‍हटले आहे.

RGP Criticism Against Ajay Kholkar
Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

महिलांचा आदर हा तडजोडीचा विषय असू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या अयोग्य वर्तनाचे समर्थन करण्यासाठी, बचाव करण्यासाठी किंवा त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी समाजाच्या ओळखीचा गैरवापर करू नये. समाजाच्या नावाआड लपण्याऐवजी स्वतःच्या शब्दांची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

खोलकरांविरोधात केपेत तक्रार

शविना शिरोडकर यांच्याबाबत केलेल्‍या आक्षेपार्ह वक्तव्‍यांप्रकरणी ‘आरजी’च्‍या कुशावती समितीने अजय खोलकर यांच्याविरोधात केपे पोलिस स्‍थानकात ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खोलकर यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.

RGP Criticism Against Ajay Kholkar
Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.