

पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाची नव्याने उभारणी करत पक्ष मजबूत करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात असून येत्या विधानसभा निवडणूकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्यासाठी ‘आरजी’ सज्ज आहे.
गोमंतकीय जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, गोमंतकीयांना प्राधान्य देणारे सरकार सत्तारुढ करणे गरजेचे असल्याचे मत आमदार वीरेश बोरकर यांनी व्यक्त केले. पाटो-पणजी येथील नव्या जागी सुरू करण्यात आलेल्या ‘आरजी’ पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोरकर बोलत होते. यावेळी ‘आरजी’ पक्ष राज्यप्रमुख शविना शिरोडकर, नितीन नाईक, प्रेमानंद गावडे, मेल्विन डिसिल्वा व इतर उपस्थित होते.
बोरकर म्हणाले की, आम्ही गोवेकरांना चांगले सरकार देण्यासाठी कॉंग्रेससोबत युतीची बोलणी करत आहोत. आज याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी युती समितीची कॉंग्रेससोबत बैठक होणार आहे. राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे; परंतु ‘आप’ व गोवा फॉरवर्डची काय भूमिका आहे हे सांगणे कठीण आहे.
जुन्या कार्यालयाशी संबंध नाही!
‘आरजी’ पक्षाची सुरवात झाली होती त्यावेळी आमच्या बोधचिन्हात पिवळा, काळा व पांढरा रंग होता. तो आमच्यासाठी सकारात्मक आहे म्हणून तो रंग नव्याने स्वीकारला आहे. आमचे जे पूर्वी जुने कार्यालय होते त्याच्याशी आमचा आता संबंध नाही, अशी स्पष्ट ग्वाही वीरेश बोरकर यांनी दिली. त्यासोबतच, ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्र येऊन विधानसभेसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ‘आरजी’च्या तिन्ही जिल्हा समित्यांची घोषणा करण्यात आली तसेच राज्य कार्यकारणीला नियुक्ती पत्रे देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.