राज्यातील महिलांच्या सुरक्षितते बाबतचा प्रश्न जास्त चिंतेचा बनत चालला आहे. महिला असुरक्षिततेबाबत गोवा अग्रस्थानी आहे. यावर तोडगा काढत गोवा (Goa) सुराज्य पक्ष म्हणजेच आरजी (Revolutionary Goans) ने महिलांसाठी स्त्री सेफ्टी हे एक विशेष अॅप (App) बनवले आहे; हे अॅप पूर्णपणे फ्री असून, मोबईल (Mobile) मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर केवळ हे अॅप सुरू करून मोबाईल शेक केल्यास तुम्हाला त्वरित मदत मिळणार आहे. हे अॅप वापरण्यास कोणालाही कोणतेही बंधन नाही अगदी परदेशीय, परप्रांतीय महिला देखील हे अॅप वापरू शकतात.
या अॅपच आज लॉन्चिंग करण्यात आले असून, आज पासून हे तुम्ही वापरु शकता. या अॅपचे लॉन्चिंग अध्यक्ष मनोज परब यांच्या हस्ते झाले.
राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यात हे सरकार पूर्ण पणे अपयशी ठरले आहे, आज राज्यातील महिला घराबाहेर पाडण्यासाठी घाबरतात, घाबरत जगतात, घरातील मुली बाहेर गेल्यानंतर परत येतील की नाही याची काळजी पालकांना लागून असते, गोव्यात दर 8 दिवसाला 5 रेप केस फाइल होतात गोव्यातील या अत्याचाराच्या सत्राला पूर्णविरामच मिळत नाही, म्हणूनच महिलांच्या सेफ्टी साठी आम्ही हे अॅप लॉन्च केले आहे.
मनोज परब
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.