CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

"लोकांना हवे तेच आम्ही करू", CM सावंतांनी दिली ग्‍वाही; निवृत्त न्‍यायाधीश रिबेलो यांच्या मागण्‍या पोहोचल्‍या सरकारकडे

CM Pramod Sawant: पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना मुख्‍यमंत्री सावंत यांनी वरील माहिती दिली. भू-महसूल संहितेत दुरुस्‍ती करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.
Published on

पणजी: निवृत्त न्‍यायाधीश फर्दिन रिबेलो यांनी आयोजित केलेल्‍या सभेत ज्‍या मागण्‍या केल्‍या आहेत, त्‍या सरकारकडे पोहोचल्‍या आहेत. त्‍यावर अभ्‍यास होईल. ‘लोकांना जे हवे तेच करू’, अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी वरील माहिती दिली. भू-महसूल संहितेत दुरुस्‍ती करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले. पणजीतील सभेच्‍या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्री सावंत यांनी सकारात्‍मकता दर्शविल्‍याने ग्राम व नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त ठरलेली १७ (२) व ३९ (अ) ही कलमे वगळली जाणार काय, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

झालेल्‍या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले गेले, त्‍याची मुख्यमंत्र्यांनी सविस्‍तर माहिती दिली.दरम्यान, हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर करण्यात आलेल्या न्यायदंडाधिकारी चौकशीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्याबाबत सरकार अनुत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

CM Pramod Sawant
Ferdino Rebello: ‘गोव्याच्या प्रजेचा आवाज’ कडाडला! न्‍या. रिबेलो यांच्‍या हाकेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; सभेत केल्या 3 मागण्या Watch Video

या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हा अहवाल किमान विधानसभेत तरी सादर करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. या प्रकरणावर सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारण्यात आला असता त्यांनी, ‘विधानसभेच्या कामकाजाबाबत आताच भाष्य करणे योग्य नाही,’ असे सांगत विषयावर अधिक बोलणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com