डिचोली (Bicholim): डिचोली कोमुनिनाद (Goa Comunidad) मंडळावर ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काल झालेल्या कोमुनिदादच्या निवडणुकीत (Comunidad Election) ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्ट पुरस्कृत नारायण शंकर गावकर यांच्या अध्यक्षतेखालील मंडळ निवडून आले. कोमुनिदाद प्रशासक कार्यालयाच्या आदेशानुसार डिचोली कोमुनिदादची सर्वसाधारण सभा काल (रविवारी) गावकरवाडा येथे कोमुनिदाद सभागृहात पार पडली. या सभेत कोमुनिदाद मंडळ निवडण्यासाठी निवडणूक (Election) घेण्यात आली. यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून दीपाली गाड उपस्थित होत्या.
2022 ते 25 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडण्यात आलेले कोमुनिदादचे कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे- नारायण शंकर गावकर (अध्यक्ष), शांभा दत्तू गावकर (मुखत्यार), वल्लभ शांताराम परब (खजिनदार), सातू चंद्रकांत गावकर (उपाध्यक्ष), दर्शन गजानन गावकर (उपमुखत्यार) आणि दीपेश कृष्णा गावकर (उपखजिनदार).
भागधारकांचा विजय
कोमुनिदाद निवडणुकीत पुरस्कृत पॅनेल निवडून आल्याबद्दल ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टने समाधान व्यक्त केले. हा भागधारकांचा विजय असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष सतीश गावकर यांनी निवडणुकीनंतर पत्रकारांशी (Journalist) बोलताना म्हटले आहे. यावेळी सुनील परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. डिचोली कोमुनिदाद कारभार व्यवस्थित चालत असून, नूतन मंडळाकडूनही तशीच अपेक्षा आहे. असे सतीश गावकर यांनी सांगून देवस्थान आणि ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टकडून सदैव सहकार्य मिळेल. असे सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.