वास्कोतील मोठी आस्थापने बेकायदेशीर कृत्य करत आहेत: काँग्रेसचे नजिर खान

इंडियन ऑइल कंपनीची स्वतःची संरक्षक भिंत असताना उड्डाणपुलावर पत्रे लावल्याने पादचाऱ्यांना बरोबर वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nazir Khan discussing with Jayant Tari Vasco

Nazir Khan discussing with Jayant Tari Vasco

Dainik Gomantak

Published on
Updated on

वास्को: वास्कोतील मोठी आस्थापने मुरगांव नगरपालीकेला गृहीत न धरता, आपल्याला पाहीजे त्या प्रमाणे बेकायदेशीर कामे करीत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजिर खान यांनी केला. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या वास्को आयओसी उड्डाणपुलावर इंडियन ऑयल कंपनीने मुरगाव पालिकेची रितसर परवानगी न घेता, उड्डाणपुलावरील एका बाजूला पत्रे लावून एका प्रकारे बेकायदेशीर काम केले आहे.

Nazir Khan discussing with Jayant Tari Vasco

'...तर कुंकळ्ळीतील प्रदूषणकारी कारखाने सहा महिन्यात हटवू'

Illegal construction on the flyover

Illegal construction on the flyover

Dainik Gomantak

इंडियन ऑइल कंपनीची स्वतःची संरक्षक भिंत असताना उड्डाणपुलावर पत्रे लावल्याने पादचाऱ्यांना बरोबर वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती खान यांनी दिली. याप्रकरणी वास्को काँग्रेस मंडळाचे नंदादीप राऊत, साजिद शेख व नजीर खान यांनी मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी यांची भेट घेऊन त्वरित याविषयी लक्ष घालण्याची मागणी केली. मुख्याधिकारी तारी यांनी संबंधित कंपनीला (Company) लवकरच बोलावून याप्रकरणी सोक्षमोक्ष लावण्यात येईल अशी माहिती दिली.

वास्को येथील इंडियन ऑइल कंपनीने राष्ट्रीय महामार्ग मार्गाच्या उड्डाणपुलावर मुरगाव (Mormugao) नगरपालिकेची रीतसर परवानगी न घेता एका प्रकारे बेकायदेशीर कृत्य केले आहे. इंडियन ऑइल कंपनीने उड्डाणपुलावर पत्रे लावण्यासाठी प्रामुख्याने मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणे महत्त्वाचे होते. मात्र कंपनीने सदर निवेदन मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना देऊन एका प्रकारे मोठी चूक केली असल्याची माहिती वास्को काँग्रेस मंडळाने केली आहे. सदर वास्को उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येत असला तरी मुरगाव नगरपालिकेची परवानगी घेणे अत्यंत गरजेचे असल्याची माहिती गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी दिली.

Nazir Khan discussing with Jayant Tari Vasco

'पर्यटन क्षेत्रात गोवा सरकार अतुलनीय काम करतयं': पीयूष गोयल

मात्र इंडियन ऑइल कंपनीने वास्को येथील उड्डाणपुलावरील एका बाजूला पत्रे लावताना मुरगाव नगरपालिका किंवा मार्ग प्राधिकरणाची परवानगी घेणे महत्त्वाचे होते. पण इंडियन ऑईल कंपनीने मोरगाव नगरपालिका नगराध्यक्षांना निवेदन सादर करताना त्यात गुप्तचर विभागाच्या माहितीच्या अंतर्गत उड्डाणपुलावर पत्रे लावण्यात येत असल्याची माहिती निवेदनातून दिली असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली. मात्र इंडियन ऑईल कंपनीने उड्डाणपुलावर पत्रे लावल्याने सध्या पादचाऱ्याबरोबर वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता युवा काँग्रेस नेते नंदादिप राऊत यांनी, तारी यांना माहिती दिली.

वास्कोत (Vasco) असलेली मोठी आस्थापने मुरगाव नगरपालिकेला गृहीत न धरता आपल्या नियमानुसार पाहिजे त्या प्रकारे बेकायदेशीर कामे करीत असल्याची माहिती नजीर खान यांनी दिली. तसेच इंडियन ऑइल कंपनीने सुद्धा उड्डाणपुलावर पत्रे लावून मुरगाव नगरपालिकेची परवानगी घेतलेली नाही. इंडियन ऑइल कंपनी मुरगाव नगरपालिकेला अंदाजे सत्तावीस कोटी थकबाकी येणे असून याविषयी सुद्धा मुरगाव नगरपालिका गप्प आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com