Castle Rock-Caranzol: कॅसलरॉक-करंझोळ रेल्वे मार्ग पूर्ववत; रेल्वे रुळाची चाचणी पूर्ण

अनेक ठिकाणी दरडीही कोसळल्या होत्या
Castle Rock-Caranzol
Castle Rock-CaranzolDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Castle Rock-Caranzol: मागील महिन्याभरात धुव्वाधार पावसाने राज्यभरात थैमान घातले होते. यामुळे ठीकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी दरडीही कोसळल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी कॅसलरॉक - करंझोळ रेल्वे मार्गावर भूस्खलन झाले होते. त्यामुळे काही ट्रेन्स रद्द झाल्या होत्या तर काही निश्चित स्थानकाच्या पूर्वी थांबवल्या होत्या. दरम्यान आता हा रेल्वे ट्रॅक सुरळीत करण्यात आला आहे.

Castle Rock-Caranzol
कॅसलरॉक - करंझोळ रेल्वे मार्गावर भूस्खलन, एक ट्रेन्स रद्द तर काही निश्चित स्थानकापूर्वी थांबणार

रेल्वे मार्गावरील दरड हटवण्यात यंत्रणेला यश आले असून, रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आला आहे. तसेच रेल्वेमार्गाची एक चाचणीही पूर्ण करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जेव्हा दरड कोसळली होती, तेव्हा 25 जुलै रोजी सुटणारी वास्को-द-गामा यशवंतपूर ट्रेन नबर 17310 देखील रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली होती.

आता लवकरच या मार्गावरून ट्रेन पूर्ववत सुरू होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaibhavi IIT success story
Viral Post
Goa Shack Licenses Before October
India First Rock Check Dam Indus River
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com