गोवा अन् मणिपूर राज्याची जबाबदारी विद्यमान मुख्यमंत्र्यांकडेचं

गोवा आणि मणिपूरमध्ये राज्याची जबाबदारी विद्यमान मुख्यमंत्र्यांकडेचं सोपविली जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपने जिंकलेल्या चार राज्यांमध्ये होळीनंतर नवीन सरकारे स्थापन होणार आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्री होळीनंतर भेट देणार आहेत. विशेष म्हणजे प्रमोद सावंत यांच्याकडे गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. मात्र, भाजप नेते विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात होते. गोव्यात भाजपने (BJP) 40 पैकी 20 जागा जिंकल्या असून काही अपक्ष आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. प्रमोद सावंत यांनी अत्यंत कमी मतांनी आपली जागा जिंकली होती.

Pramod Sawant
पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते भगवंत मान यांनी घेतली शपथ

दरम्यान, मणिपूरमध्ये (Manipur) मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मणिपूरमधील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरचे काळजीवाहू मुख्यमंत्री बिरेन सिंग आणि थोंगम बिस्वजित सिंग या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com