Goa BJP: याच भीतीने विरोधकांनी महाआघाडी करण्याचा केला प्रयत्न

नरेंद्र सावईकर : विरोधकांकडून पक्षाविरोधात अफवांचे पीक
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधक कुठेही दिसत नाहीत. भाजपला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि येणारे सरकार भाजपचेच असेल, या भीतीने विरोधकांनी महाआघाडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे भाजपच्या (Goa BJP) विरोधात अकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस, तथा प्रवक्ते ॲड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.(response from people to goa BJP election campaign increased)

Goa BJP
'इतर पक्षांच्या सरचिटणीसांशी वाद घालायचा नाही' पी चिदंबरम यांचा पलटवार

पणजीतील (Panjim) भाजपच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेत सावईकर बोलत होते. यावेळी माजी आमदार तथा पक्ष प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. सावईकर म्हणाले, भाजपच्या 34 उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गोविंद गावडे यांनी प्रियोळ तर नीलेश काब्राल यांनी कुडचडेतून अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या सरकारने गेल्या सात वर्षांत केलेला देशाचा विकास, आणि गोव्यात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखाली केलेला गोव्याचा विकास मतदारांसमोर आहे.

पार्सेकर, उत्पल भाजपसोबतच! : लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते भाजपसोबतच राहतील. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तसेच उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हेही भाजपचेच आहेत. त्यामुळे त्यांनी भाजप सोडू नये. पक्षाचे काम करत राहावे, अशी आम्ही त्यांना पुन्हा एकदा सूचना केली आहे. भाजप हा एक मोठा परिवार आहे आणि परिवारामध्ये नाराजीही असते. मात्र, पक्षासाठी आणि लोकहितासाठी काम करताना सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे पक्षाचे धोरण असल्याचे सावईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com