Porvorim Accident: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचे अपयश गुन्हेगारी, अपघातांमुळे उघड

Porvorim Accident: युरी आलेमाव यांची टीका : अपघातांच्या जबाबदारीचे उत्तरदायित्व मुख्यमंत्र्यांनी घ्यावे
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Accident: आणखी एका भीषण अपघाताने आणखी तिघांचे जीव घेतले. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कायदा उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे या घटनेने परत एकदा उघड झाले आहे.

मद्यधुंद वाहन चालवणे सुरूच आहे, काळ्या काचेच्या गाडीतून मृतदेह सीमेपलीकडे घेऊन गेले तरी पोलिसांना त्याची माहिती नसते.

Yuri Alemao
Aditya - L1 मोहीम कशासाठी जाणून घ्या एका क्लिकवर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आतातरी जबाबदारी निश्चित करणार की दोषारोपाचा खेळ सुरूच ठेवणार? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला आहे. या घटनेला जबाबदार कोण याचे उत्तरदायित्व मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे बाणस्तारी येथे झालेल्या भीषण अपघातातून भाजप सरकारने अजूनही धडा घेतलेला नाही असे दिसते.

पर्वरी येथे झालेल्या अपघाताने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी प्रत्यक्षात जागृत राहायला हवे नेमके त्यावेळीच ते गाढ झोपेत होते हे स्पष्ट झाले, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

शनिवारी रात्री मडगावात खुनाची घटना घडते, तर पर्वरी येथून प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा खून करून तो राज्याबाहेर नेऊन जंगलात टाकला जातो अशा घटनांबाबत आलेमाव यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून ‘गोवा हे मर्डर डेस्टिनेशन’ झाले असल्याची टीका केली होती.

राज्यात मागील सहा दिवसांत तीन खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे राज्य हादरले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.

Yuri Alemao
Vishwajeet Rane: हत्तीपावल येथील उपक्रमांचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

तरुणांनी जबाबदारीने वागावे

अपघातांसारख्या घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी जबाबदारीने वागावे. माझी पालकांनाही विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावे. अतिसाहसाचा परिणाम वाईट होतो हे आपण सर्वांनी समजून घेऊया, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

गोव्यातील असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजप सरकारकडून कोणतीही आशा नसल्याने नागरिकांनी शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारण्याची वेळ आली आहे. मी सर्व गोमंतकीयांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

अधिकाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती

दोन दिवसांपूर्वी गोव्याच्या सीमेबाहेर एका काळ्या काचेच्या वाहनातून मृतदेह नेण्यात आला होता. या घटनेने सीमेवरील तपासणी नाक्यावरील पोलिस, आरटीओ, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकतर त्या मुलीच्या मारेकऱ्यांशी हातमिळवणी केली होती किंवा त्यांच्या कर्तव्य बजावण्यात ते सर्व अपयशी ठरले हे स्पष्ट झाले आहे.

अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदार वृत्तीमुळेच गुन्हेगारीच्या घटना आणि जीवघेणे अपघात होत आहेत, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com