Coal Pollution: असह्य दुर्गंधीमुळे मुरगाववासी हैराण

Coal Pollution: कोळसा प्रदूषण : 15 दिवसांत समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन : आमोणकर
Coal Pollution
Coal PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Coal Pollution: मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी करताना उग्र वास येत असल्याने मुरगाववासी त्रस्त झाले आहेत. येथील रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी उपजिल्हाधिकारी यांच्यासह एमपीए, पोलिस आणि कोळसा हाताळणी करणाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली.

Coal Pollution
Padma Shri Award: प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री जाहिर; जाणून घ्या कार्य

उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी एका आठवड्यात संबंधितांसह संयुक्तपणे जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले. आमदार आमोणकर यांनी 15 दिवसांची मुदत दिली असून तोपर्यंत समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

रहिवाशांच्या तक्रारीची नोंद घेऊन आमदार आमोणकर यांनी आज गुरुवारी मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली. यावेळी जयराज तांबूराज (अदानी), कॅ. अनुराग बागावती,

अँथनी फर्नांडिस (दक्षिण-पश्चिम रेल्वे), वास्को शहरी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी दयानंद ठक्कर, मामलेदार प्रवीणजय पंडित, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, राज्य कामगार सचिव कार्यालयाचे अधिकारी, वास्को पोलिस, वाहतूक पोलिस व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार आमोणकर यांनी, बंदरात प्रदूषण होत असेल तर संबंधित कंपनीने येत्या आठवड्यात यावर उपाय योजण्याचे आवाहन केले. जर ही समस्या सुटली नाही तर नागरिकांना घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.

मुरगाव बंदरात हाताळण्यात येणाऱ्या कुठल्या मालामुळे अथवा कोळशावर मारण्यात येणाऱ्या पाण्यातून तो वास येतो का, ते शोधून काढण्यास संबंधित अधिकाऱ्यांना आमोणकर यांनी सांगितले. तो वास कशामुळे येतो, याचा शोध घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

Coal Pollution
Goa Beach: किनारा व्यवस्थापन होणार अधिक सुकर

रात्री श्‍वास घेणे होते कठीण

मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या धक्का क्र.५ वर जेएसडब्ल्यू, तर धक्का क्र.६ वर अदानी कंपनी कोळसा हाताळणी करीत आहेत. कोळसा हाताळणी करताना गेल्या काही महिन्यांपासून रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत सडा, जेटी, रुमडावाडा, बोगदा परिसरात एक विचित्र प्रकारची दुर्गंधी पसरत असल्याने येथील रहिवाशांना श्वास घेताना खूपच अडचणी येत आहेत. या विचित्र दुर्गंधीविषयी नागरिकांनी आमदार आमोणकर यांना उपाय काढण्याची मागणी केली होती.

कोळसा कंपन्यांकडून इन्कार

यावेळी अदानी, जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोळसा हाताळणीमुळे हा वास येत नाही. सडा व इतर भागात कोळसा हाताळणीचा वास येत नाही. मात्र, आणखी कुठून तरी विचित्र प्रकारची दुर्गंधी येते, असा दावा अदानी, जेएसडब्ल्यू, दक्षिण-पश्चिम रेल्वे लिमिटेडतर्फे करण्यात आला. या समस्येचे निवारण लवकरात लवकर करण्यात येईल, अशी ग्वाही संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com