Padma Shri Award: प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री जाहिर; जाणून घ्या कार्य

Padma Shri Award: ओसाड जमिनीत डोंगराळ भागातून भुयारांद्वारे पाणी आणून कुळागराचे नंदनवन बनविले.
Padma Awards 2024
Padma Awards 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Padma Shri Award: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील पहिल्या महिला माहुत पार्वती बरुआ आणि जागेश्वर यादव यांच्यासह 34 व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गोव्‍यातील सावईवेरे येथील हरित क्रांतिकारक म्‍हणून ओळखले जाणारे प्रगतशील शेतकरी संजय अनंत पाटील (५८) यांना पद्मश्री पुरस्‍कार जाहीर झाला आहे.

Padma Awards 2024
Goa Beach: किनारा व्यवस्थापन होणार अधिक सुकर

ओसाड जमिनीत डोंगराळ भागातून भुयारांद्वारे पाणी आणून पाटील यांनी कुळागराचे नंदनवन बनविले. या कामगिरीची दखल घेण्‍यात आली आहे. प्रबळ इच्‍छाशक्‍ती व बुद्धिमत्तेच्‍या जोरावर पाणी टंचाईवर यशस्‍वीपणे मात करून हरितक्रांतीचे लक्ष्‍य साध्‍य करता येते, असा कृतिशील संदेश पाटील यांनी दिला. पाटील यांच्‍यावर राज्‍यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यासोबतच माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेते चिरंजीवी, बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, होरमूसजी कामा, आश्विन मेहता, माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल आणि कुंदन व्यास यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे.

Padma Awards 2024
Goa University: गोवा विद्यापीठ वसतीगृहातील खाद्यपदार्थांत सापडल्या अळ्या

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पद्म सन्मानांची घोषणा गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली. एकूण पाच जणांना पद्म भूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

संजय पाटील यांना ‘वन-मॅन-आर्मी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी एकट्याने दहा एकर जमिनीच्या ओसा-ड भूखंडाचे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तांत्रिक मार्गदर्शनाने हिरव्यागार नैसर्गिक कुळागारात रूपांतर केले. त्यांचे शिक्षण 11 वी पर्यंत झाले असले तरी त्यांच्याकडे एका उच्च अभियंत्याचे ज्ञान आणि कौशल्ये आहेत.

शेणापासून उत्पादित जीवामृत वापरून जलसंधारण आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा विचार त्यांनी पुढे नेला. तो लहान शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायीआहे. पाटील यांना गेल्यावर्षी प्रगतीशी शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

असे आहे कार्य

  • संजय पाटील यांनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत सुपारीच्‍या बागायती फुलवल्‍या. त्‍यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले.

  • पाटील यांनी पाण्यासाठी कुळागारात मोठमोठे बोगदे मारून पाणी सर्वदूर पोहोचविले. त्यांनी तयार केलेले बोगदे शेतकऱ्यांसाठी पथदर्शी ठरत आहेत.

  • पाटील यांनी कुळागर जीवंत ठेवण्यासाठी बोगदे मारत पाण्याचे स्रोत मिळविले. हे पाहून गोवा नव्‍हे अन्‍य राज्‍यांतील शेतकरी अवाक्‌ होतात.

  • बोगदे मारणे हे खूप कठीण आणि जीवावर बेतणारे असे काम होते. पण कुळागर वाचविण्यासाठी हे करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

  • कित्येक महिने सतत खणून हे बोगदे मारण्यात आले व शेवटी पाण्याचे स्रोत हाती लागले, असे अनुभवही संजय पाटील व्‍यक्‍त करतात.

गेल्या 35 वर्षांचे श्रम फळाला आले. मला मिळालेला सन्मान हा गोव्यातील तमाम शेतकऱ्यांचा गौरव आहे.

- संजय पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com