Betalbatim News : बेताळभाटीवासीयांचे पाण्याविना हाल; टॅंकरवरच भिस्त

‘साबांखा’कडून ‘जायका’द्वारे कामुर्लीत पाणीपुरवठा
Water tanker
Water tanker Dainik Gomantak

सासष्टी तालुक्यातील कामुर्ली, राय परिसरात मागील दहा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारीनंतर ‘साबांखा’कडून युद्धपातळीवर काम करून ‘जायका’ जलवाहिनीची जोडणी देण्यात आल्याने कामुर्लीवासीयांना पाणी मिळू लागले आहे.

मात्र, बेताळभाटी परिसरातील रहिवाशांना अजूनही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे स्थानिकांत नाराजी पसरलेली आहे. सासष्टी तालुक्यातील बेताळभाटीतील नागरिकांनी गेले कित्येक दिवस नळांना पाणी येत नव्हते.

मात्र, किनारपट्टी भागातील हॉटेल आस्थापनांना पाणी मिळत होते तर स्थानिक नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडूनही पाण्याचा योग्य दाब येत नसल्याने पाणी पुरवठा होत नाही किंवा वीज खंडित होत असल्याने पाण्याचा दाब कमी जास्त होतो व पुरवठा योग्य होत नसल्याचे सांगण्यात आले आहे .

Water tanker
Dead Body Found at Ambaulim: आंबावलीत आढळला 41 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; पोलीस तपास सुरू

उन्हाळा सुरू होण्याच्या आधीपासून पाण्याच्या कमी दाबाचा प्रश्न बेताळभाटीतील नागरिकांसमोर कायम आहे. ग्रामसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता. पाण्याचा दाब कमी होत असल्याने पाणी येत नसल्यास दुसरी जलवाहिनी टाकण्याची मागणी होत आहे.

कामुर्ली परिसरात मागील दहा दिवस नळांना अजिबात पाणी आले नव्हते. दाब कमी असल्याने पाणी वर चढत नाही. लोटलीकडे जाणारे पाणी बंद करून या भागाला पाणी सोडण्यास सांगण्यात आले होते. तसे केले तरीही पाण्याचा दाब कमी असल्याने नळांना पाणी येत नाही.

त्यापूर्वी आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी पाण्याची टंचाई आहे. बांधकाम खात्याकडून नक्की का पाणी येत नाही, ते सांगितले जात नसल्याची तक्रार केली जात होती. या काळात पंचांनी टँकरने पाणी पुरवठा केला.

Water tanker
Bicholim News : डिचोलीत ‘निमुजग्या’कडे टाकतात कचरा; कारवाई अटळ

पाणी पुरवा; अन्यथा घागर मोर्चा !

कामुर्लीतील रहिवाशांच्या तक्रारीनंतर बांधकाम विभागाकडून या भागाला जोडण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हचा शोध घेत ती जलवाहिनी जायकाच्या दुसऱ्या जलवाहिनीशी जोडण्यात आली. त्यानंतर बधुवारपासून पाणी पुरवठा सुरू झाल्याचे सरपंच बासिलो फर्नांडिस यांनी सांगितले. या प्रकरणानंतर कामुर्लीतील प्रश्न मिटला आहे.

मात्र, बेताळभाटीत नळ मात्र कोरडेच राहिले आहेत. त्यामुळे स्थानिकांनी चार दिवसांत पाणी द्या,अशी मागणी केली आहे. अन्यथा घागर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com