पुरातत्व खात्याने संरक्षित केलेल्या आणि शहरातील ‘निमुजगा’ या ऐतिहासिक वास्तूकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्यावेळी काळोखाचा फायदा घेऊन कचरा टाकण्यात येत असल्याचे उघड झाले. या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा बसविल्यानंतरही कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहेत.
रात्रीच्यावेळी मोटरसायकलवरून आलेली एक व्यक्ती ‘निमुजग्या’कडील रस्त्यावर कचरा टाकतानाचा प्रसंगही सीसीटिव्हीत चित्रित झाला आहे.
दरम्यान, पालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कचरा टाकणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पावलेही उचलली आहेत. तसे संकेतही नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी दिले आहेत.
दरम्यान, रात्रीच्यावेळी कचरा टाकणारी व्यक्ती कोण? त्याचा पालिका शोध घेत आहे. ‘निमुजग्या’कडे जाणाऱ्या पाजवाड्याच्या माथ्यावरील रस्त्यावर तर कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
"‘निमुजग्या’कडील रस्त्यावर कचऱ्याची समस्या मोठी आहे. या परिसरात शहराबाहेरील काही व्यक्ती रात्रीच्यावेळी कचरा टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे फुटेजही हाती लागले आहे. हा प्रकार वेळीच बंद करावा. अन्यथा कचरा फेकणाऱ्यांना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यावाचून पर्याय राहणार नाही."
कुंदन फळारी, नगराध्यक्ष
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.