Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष

Gomantak Bhandari Samaj: गोमंतक भंडारी समाजाचे विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील समिती उत्तर गोवा संस्था महानिरीक्षकांनी बेकायदेशीर ठरवणारा दिलेला निवाडा आज (25 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तांत्रिक कारणावरुन रद्दबातल ठरवला.
Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष
Gomantak Bhandari Samaj President Ashok Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतक भंडारी समाजाचे विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील समिती उत्तर गोवा संस्था महानिरीक्षकांनी बेकायदेशीर ठरवणारा दिलेला निवाडा आज (25 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तांत्रिक कारणावरुन रद्दबातल ठरवला. त्यामुळे अशोक नाईक यांच्या गटाला खंडपीठाकडून दिलासा मिळाला आहे. संस्था महानिरीक्षकांच्या आदेशाला नाईक यांच्या गटाने खंडपीठात आव्हान दिले होते. गोमंतक भंडारी समाजात वर्चस्वावरुन सुरु असलेला संघर्षात न्यायालयीन लढ्याद्वारे नाईक गटाने बाजी मारली आहे, तर उपेंद्र नाईक गटाला पुन्हा चपराक बसली आहे.

भंडारी समाजातील संघर्ष

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गोमंतक भंडारी समाजाच्या अस्तित्वात असलेल्या समिती व वर्चस्वावरुन संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या समाजामध्ये विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक व उपेंद्र गावकर असे दोन गट झाले आहेत. गावकर गटातर्फे ॲड. आतिष मांद्रेकर यांनी विद्यमान समाजाच्या समितीविरोधात संस्था महानिरीक्षकांसमोर तक्रार दाखल केली होती.

Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष
Goa Bhandari Samaj Aam Sabha: भंडारी समाज आमसभेत प्रचंड गोंधळ; अध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार

कथित गैरव्यवहाराची चौकशी

ही समिती बेकायदेशीर ठरवण्याची तसेच झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीवर सुनावणी घेऊन गेल्या 23 ऑक्टोबरला उत्तर गोवा संस्था महानिरीक्षकांनी निवाडा दिला होता. त्यामध्ये त्यांनी समाजासंदर्भात कोणतेच मोठे निर्णय घेण्यास प्रतिबंध घातला होता तसेच समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास बंदी घातली होती. संस्थेची केलेली घटना दुरुस्तीही रद्दबातल ठरविली होती तसेच 2011 नंतर घेतलेले सर्व निर्णय बेकायदा ठरवले होते. या समाजाच्या संस्थेवर प्रशासक नेमण्याची व निवडणूक घेण्याची शिफारस सरकारला केली होती व प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर समाजाच्या संस्थेचा दस्तावेज स्वाधीन करण्याचे निर्देश दिले होते. या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष
Bhandari Samaj Committee: अशोक नाईक गटाला मोठा धक्का! महानिबंधकांनी समिती ठरवली बेकायदेशीर; भंडारी समाजातील वाद

संस्था महानिरीक्षकांसमोर पुन्हा सुनावणी

गोवा खंडपीठाने आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी संस्था महानिरीक्षकांनी दिलेल्या निवाड्यातील मुद्यावर खोलवर न जाता त्यातील तांत्रिक त्रुटीचा आधार घेत तो रद्दबातल ठरविला आहे. याचिकादार गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक गटाला पाठविलेल्या नोटिशीत त्रुटी आहेत. त्यामुळे कायदेशीर योग्य ती प्रक्रिया करून निर्णय द्यावा असे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुन्हा आता संस्था महानिरीक्षकांसमोर सुनावणी होणार आहे. दोघांच्या बाजू ऐकून नव्याने निवाडा दिला जाणार आहे.

Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष
Gomantak Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या आमसभेत गदारोळ, आरोप-प्रत्यारोपांमुळे सभा अर्ध्यावरच गुंडाळली

सत्याचा विजय: अशोक नाईक

गोमंतक भंडारी समाजाच्या विद्यमान समितीचा हा सत्याचा विजय आहे. समितीने नेहमीच समाजाचे हित जपण्यासाठी निर्णय घेतले आहेत. समितीने केलेल्या घटना दुरुस्त्या या समाजाचा गैरफायदा कोणी घेऊ नये यासाठी करण्यात आल्या होत्या. या समितीने कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. या समाजाची निवडणूक व्हावी यासाठी आम्ही तयार आहोत. अनेकदा विरोधी गटाला यावर तोडगा काढण्यासाठी सामंजस्याने चर्चा करण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com