सासष्टी: मडगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या नाल्यांतील पाण्याची तपासणी करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने मडगाव नगरपालिका, द सिव्हरेज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ऑफ गोवा, आरोग्य खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शर्मिला मोंतेरो यानी हा आदेश संबंधित संस्थांना दिला आहे. या संस्थांनी 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करणे आवश्यक आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात मडगावमधील सर्व नाल्यांतील पाण्याची संयुक्त पाहणी होण्याची शक्यता आहे.
नावेली येथील रहिवासी आंतोनियो आल्वारीस याने उच्च न्यायालयात या संबंधी याचिका दाखल केली असून त्यात मडगावमधील सांडपाणी नावेली येथील साळपे तळीत सोडले जाते त्यामुळे एकेकाळी नैसर्गिक सुंदरता लाभलेली ही तळी प्रदूषित झाली आहे.
मडगाव व फातोर्डामधील व्यापारी आस्थापने व नागरीक सुद्धा कुडचडकर हॉस्पिटल जवळील नाल्यात सांडपाणी सोडत आहेत, हे कित्येकदा पाहणीत दिसून आले आहे.
मडगाव नगरपालिकेन 65 व्यापारी आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत, असे नगरपालिकेने गोवा प्रदूषण नियंत्रण मडळाला कळवले आहे. याच नाल्यातून नव्हे तर इतर अनेक नाल्यांतून सांडपाणी सोडले जाते, असे नगरपालिकेने मंडळाच्या नजरेस यापूर्वी आणून दिले आहे.
साळ नदीसंबंधीचा अहवाल कुठे ?
ज्या नाल्यांतील पाणी साळ नदीमध्ये सोडले जाते त्या सर्व नाल्यांसंबंधीचा एक अहवाल जलस्त्रोत खात्याने तयार केला होता. मात्र या अहवालाचे काय झाले व तो कुठे आहे,याची कुणालाही माहिती नाही. या अहवालाप्रमाणे मडगाव व फातोर्डा येथील सांडपाण्याच्या नाल्यातील दूषित पाणी केवळ एकाच ठिकाणाहून साळ नदीमध्ये सोडले जात नसून कित्येक ठिकाणाहून ते सोडले जाते,असे अहवालात नमूद करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.