वास्को: मुरगाव पालिका इमारतीचे नूतनीकरणाचे काम जवळजवळ नऊ कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. त्यानुसार 19 मार्च 2021 रोजी सदर कामाची निविदा काढण्यात आली होती व कामास सुरुवात करण्यात आले होती. मध्यंतरी कोरोनाचा (Coronavirus) फैलाव झाल्याने काही प्रमाणात कामास विलंब झाला, मात्र नंतर कामाने वेग धरला. दरम्यानच्या काळात या इमारतीतील काही कार्यालये स्थलांतर करण्यास विलंब झाला, तरीही काम चालू ठेवण्यात आले होते. (Murgao Palika Latest News)
पालिका इमारतीचे एका बाजूला छप्पर घालण्याचे काम झाले आहे. तसेच आतील बाजूला सिमेंट प्लास्टर करण्याचे काम झाले आहे. रंगरंगोटीचे काम बाकी आहे. दरम्यान, इमारतीच्या दुसर्या बाजूचे काम चालू करण्यास आडकाठी येत असून यातील मुख्याधिकारी, नगराध्यक्ष कार्यालय तसेच इतर कार्यालये असून स्थलांतरित करण्यात आली नसल्याने, पुढील काम करण्यास दिरंगाई होत आहे. सदर कामाच्या निविदेचा कार्यकाळ 18 सप्टेंबर 2022 मध्ये संपत असून अवघे आठ महिने बाकी आहेत. मात्र जोपर्यंत सदर इमारतीतील पालिका कार्यालये खाली होत नाही, तोपर्यंत सदर काम सुरू करण्यास मिळत नसल्याचे या कामाच्या ठेकेदाराकडून सांगण्यात आले.
आठ महिन्यातील चार महिने पावसाचे (Rain) असून जर पालिका कार्यालय स्थलांतर होत नाही, तर पुढे पावसाचा व्यत्यय येऊन पालिका इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाला आणखी दिरंगाई होईल यात शंकाच नाही.
दरम्यान हेडलँड सडा येथील नूतन मार्केट कॉम्प्लेक्समध्ये सदर पालिका कार्यालय स्थलांतर करण्यात येणार असून सुडातर्फे सर्व तयारी करण्यात आली असली तरी येथे वीज कनेक्शन अजून करण्यात आले नसल्याचे कळवण्यात आले. त्यासाठी पालिकेकडे पैसे नसल्याने सदर वीज (Electricity) कनेक्शन काम रखडले असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.