Vasco Ferry वास्को फेरीतील दुकानगाळे हटवण्यास आठव्या दिवशी प्रारंभ

मंगळवारीही व्यवसाय सुरूच: ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
Vasco Ferry
Vasco FerryDainik Gomantak

वास्कोत भरलेल्या भजनी सप्ताहाच्या फेरीला काल सोमवारी सात दिवस पूर्ण झाले. आज मंगळवारी ही फेरी हटवण्याच्या कामाला पालिकेने सुरुवात केली. तसेच स्वतंत्रपथ मार्ग खुला करण्यात आला. मात्र, आज रात्री उशिरापर्यंत सदर फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला.

Vasco Ferry
Wildlife Park : वन्यप्राण्यांच्या प्रतिमा मुलांसाठी ठरणार आकर्षण

शेवटचा दिवस असल्याने लोकांची खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत झुंबड उडाली होती.शनिवार,रविवार तसेच सोमवारी गर्दी उसळली होती,त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

गेल्या मंगळवारी (दि.२२) रोजी वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला सुरुवात झाली होती. तत्पूर्वी दोन दिवस अगोदर फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली होती. दरम्यान यंदा या फेरीला पालिकेने सात दिवसच मुभा दिली होती.

Vasco Ferry
महामार्गालगत मद्य परवाने; न्यायालय निवाड्याचे उल्लंघन

फेरीवाल्यांची साळकरांच्या कार्यालयाकडे धाव

फेरीकाळात वाढ करावी, या मागणीसाठी फेरीवाल्यांनी आमदार कृष्णा साळकर यांच्या कार्यालयाकडे सकाळी ८.३० वा. धाव घेतली. मात्र आमदार साळकर त्यांना भेटू शकले नाहीत.

यंदा फेरीकाळात वाढ नाही: साळकर

आमच्या प्रतिनिधीने आमदार साळकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी यंदा आम्ही सात दिवसच फेरी ठेवण्यावर ठाम असून फेरीवाल्यांची मागणी फेटाळणार आहे. पालिकेलाही फेरी हटविण्याचा आदेश दिला असून पालिकेने काम सुरु केल्याचे साळकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com