Wildlife Park : वन्यप्राण्यांच्या प्रतिमा मुलांसाठी ठरणार आकर्षण

पशुपक्ष्यांची मिळेल माहिती : कांपालमधील वन्यजीव अधिवास उद्यानाचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन
Inauguration of Wildlife Park in campal by Forest Minister in panjim
Inauguration of Wildlife Park in campal by Forest Minister in panjimDainik Gomantak
Published on
Updated on

वन खात्याने कांपाल-पणजी येथील आपल्या जागेचा कायापालट केला असून, या ठिकाणी वन्यजीव आधिवास उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानात वन्यप्राण्यांच्या प्रतिमा उभारल्या असून, त्या मुलांना आकर्षण ठरणार आहेत.

Inauguration of Wildlife Park in campal by Forest Minister in panjim
Goa Rape Case: डॉ. प्रकाश अवदी यांच्याविरोधात आणखी एक विनयभंगाचा गुन्‍हा नोंद

त्याशिवाय पशुपक्ष्यांची माहिती याठिकाणी मुलांना मिळणार आहे. या उद्यानाचे मंगळवारी (ता.२९) वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी उद्‌घाटन करून त्याचे लोकार्पण केले.

या वन्यजीव आधिवास उद्यानात सांबर, चितळ, खवले मांजर, साळिंदर, किंग कोब्रा, अजगर, पाणमांजर, ऑलिव्ह रिडले जातीचे कासव, सोनेरी कोल्हा, बिबटा, गवा अशा वन्यप्राण्यांच्या प्रतिमा पाहायला मिळणार आहेत. वन खात्यातर्फे या ठिकाणी असलेल्या रोपवाटिकेचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. याशिवाय याठिकाणी मुलांना इलेक्ट्रॉनिक फलकांवर व माहितीपटाद्वारे पशुपक्ष्यांची माहिती दिली जाणार आहे.

Inauguration of Wildlife Park in campal by Forest Minister in panjim
Goa Drug Case: ड्रग्जप्रकरणी संशयित निजील, निहादचा जामीन फेटाळला

निसर्ग शिक्षण केंद्र उभारणार

वन खात्याच्या आणि स्मार्ट सिटीने उभारलेल्या वॉक-वेच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी ॲक्वाटेक शोकेस व्यावसायिक सामाजिक भागीदारीच्या (सीएसआर) माध्यमातून उभारण्याचा वन खात्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याशिवाय १९ डिसेंबरपूर्वी येथे मुलांसाठी निसर्ग शिक्षण केंद्राची उभारणी केली जाणार आहे.

धबधब्यांच्या सर्किटचे चित्रिकरण

आठ महिन्यांत ‘स्टेट ऑफ आर्ट’ची निर्मीती केली जाणार आहे. त्यात राज्यातील धबधब्यांच्या सर्किटचे ड्रोनच्या साहाय्याने छायाचित्रिकरण केले जाणार आहे. त्याशिवाय गोवा-महाराष्ट्र सीमेवरील हत्तींच्या अधिवासाचे पुरावे देणाऱ्या खुणांचे छायाचित्रणही होणार असल्याची माहिती मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com