Shripad Naik: श्रीपाद नाईक यांच्‍याकडून कदंब कर्मचाऱ्यांना दिलासा

Shripad Naik: पणजी येथील आ​झाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्‍यासाठी मी स्‍वत: मुख्यमंत्र्यांना साकडे घालीन, असे आश्‍‍वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिले.
Goa Loksabha Election 2024 | Shripad Naik
Goa Loksabha Election 2024 | Shripad NaikDainik Gomantak

Shripad Naik:

पणजी येथील आ​झाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्‍यासाठी मी स्‍वत: मुख्यमंत्र्यांना साकडे घालीन, असे आश्‍‍वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिले.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी कदंब कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यासाठी 6 मार्चपर्यंत करार करण्याचे आश्वासन दिले होते. पण हा करार पूर्ण होत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बसून राहणार, असा निर्धार कदंब कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Goa Loksabha Election 2024 | Shripad Naik
Margao Fire News: मडगावात स्टेशनरी दुकान खाक

दरम्‍यान, कदंब कर्मचाऱ्यांचा 34 महिन्यांचा रेंगाळलेला प्रोव्हिडंट फंड, महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग लागू करावा, या त्‍यांच्‍या प्रमुख मागण्‍या आहेत.

6 मार्चपर्यंत या मागण्‍यांबाबत विचार करण्‍याचे आश्‍‍वासन मुख्‍यमंत्र्यांनी दिले होते. पण त्‍याबाबत काहीच हालचाल दिसून न आल्‍याने हे कर्मचारी एकवटले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com