Goa Corona Update
Goa Corona Update Dainik Gomantak

Goa Corona Update: दिलासा! राज्यात 31 नवे कोरोना रुग्ण

24 तासांमध्ये एकूण 39 रूग्ण कोरोनामुक्त
Published on

गोव्यात गेल्या काही दिवसांत सरासरी शंभरहून अधिक नवीन कोरोनारूग्ण आढळून येत होते. मात्र आता हीच संख्या शंभरच्या खाली येवून पोहचली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे नवीन 31 रूग्ण आढळून आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासात 501 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 31 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाही रुग्णांला रूग्णालयात दाखल करण्यात आले नसून बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 39 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Goa Corona Update
Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक जाहीर

राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4014 मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे राज्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही हि दिलासादायक बाब आहे. राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.38 टक्के इतका आहे. राज्यात एकूण 2 लाख 62 हजार 803 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 58 हजार 546 रूग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची लाट संपली आहे अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com