Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक जाहीर

15 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
Ponda And Sanquelim Municipal Council 2023
Ponda And Sanquelim Municipal Council 2023Dainik Gomantak

Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: साखळी व फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी 16 मे रोजी निवडणूक होणार आहे अशी माहिती पालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी दिली.

फोंडा नगरपालिका निवडणुकीत भाजपने पुन्‍हा एकदा बाजी मारून आपला झेंडा फडकवला. 15 पैकी 10 जागांवर यश मिळवून भाजपने ही पालिका आपल्या कह्यात आणली. तर साखळी पालिकेत भाजपने एकहाती सत्ता आणली आहे. 12 पैकी 11 उमेदवार निवडून आले.

Ponda And Sanquelim Municipal Council 2023
Russian drowns at Keri beach: रशियन नागरिकाचा केरी बीच येथे बुडून मृत्यू, मायदेशी परतण्यापूर्वी काळाचा घाला

साखळी व फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी 16 मे रोजी निवडणूक होणार आहे. 15 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच जीपार्डमध्ये 18 व 19 मे रोजी निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

साखळी पालिका निवडणुकीच्या निकालानंतर काही तासांत नगराध्यक्ष कोण? या चर्चेला सुरुवात झाली. अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पत्नी सुलक्षणा यांच्या मर्जीतील व्यक्तीच नगराध्यक्षपदी बसणार हे निश्‍चित झाले आहे.

सध्या अनुभवी यशंवत माडकर, आनंद काणेकर यांची नावे चर्चेत होती. शिवाय प्रभाग 4 मध्ये जायंट किलर ठरलेल्या रश्‍मी देसाई यांनीही नगराध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केल्याने कोणाच्या गळ्यात माळ पडतेय, हे लवकरच स्पष्ट होईल.

Ponda And Sanquelim Municipal Council 2023
Goa Accident News: धावत्या जीपगाडीवर कोसळले आंब्यांचे झाड; एकजण जखमी

फोंड्यात मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनाच नगराध्यक्षपदासाठी पहिली पसंती मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. फोंड्यात मंत्री रवी नाईक यांनी भाजपला सत्ता मिळवून दिल्याने त्यांचा शब्द प्रमाण असणार आहे. यावेळी रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र निवडून आले आहेत, रितेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात काम केल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com