G20 Summit Goa 2023: 2030 च्या जागतिक उद्दिष्टापूर्वी भारत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या पणजीतील जनऔषधी केंद्राला त्यांनी भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत ओमान, जपान, रशिया, नायजेरिया, सिंगापूर, मलेशिया येथील ‘जी 20’ समूह प्रतिनिधी, युनिसेफ व बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
यानिमित्त अनेक प्रतिनिधींनी आपापल्या देशांमध्ये ही योजना लागू करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. ‘जी २०’ आरोग्यविषयक कार्यकारी गटाची दुसरी बैठक १७ ते १९ एप्रिल या कालावधीत गोव्यात होत आहे.
या आरोग्यविषयक कार्यगटाच्या बैठकीत जनऔषधी केंद्राच्या मालक तथा उद्योजिका प्रभा मेनन यांच्याशी मांडवीय यांनी संवाद साधला.
आस्थापनांच्या संख्येत शंभरपट वाढ
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेद्वारे सामान्य लोकांना स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून दिली जातात. गत ९ वर्षांत देशभरात जनऔषधी केंद्रांच्या संख्येत शंभरपट वाढ झाली आहे.
२०१४ मध्ये ८० असलेली संख्या आता ९ हजार ३०० हून अधिक झाली आहे. उत्पादनाची व्याप्ती १८०० औषधे आणि २८६ शस्त्रक्रिया उपकरणांपर्यंत विस्तारली आहे.
गत ९ वर्षांत नागरिकांची अंदाजे २० हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त बचत झाल्याचे मंत्री मांडविय यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.