प्रादेशिक पक्ष युतीबाबत संभ्रमात; भाजप, काँग्रेसची दारं बंद झाल्याने पर्यायच्या शोधात

भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) या राष्ट्रीय पक्षानी ‘एकला चलो रे’चा नारा कायम ठेवला असल्याने युतीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रादेशिक पक्षांची मात्र गोची झाली आहे.
Regional parties
Regional partiesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) या राष्ट्रीय पक्षानी ‘एकला चलो रे’चा नारा कायम ठेवला असल्याने युतीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रादेशिक पक्षांची मात्र गोची झाली आहे. केंद्रीयमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी गोव्यातील (Goa) भेटीत भाजप नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करण्याचे सूचित केले आहे. आघाडी नव्हे, तर पूर्ण बहुमताचे भाजप सरकार (BJP government) निवडून आणा, असे त्यांनी आवाहन केले आहे. काँग्रेसनेही राज्यात सुरू केलेल्या सभांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा कायम ठेवला आहे. केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर भाजप आमदार व केंद्रीय गाभा समितीची बैठक घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भातची व्यूहरचना कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. शक्यतो स्वबळावरच भाजपने ही निवडणूक लढवण्याचे तसेच त्यासाठी प्रत्येक आमदाराने लोकांपर्यंत पोहचण्याचे आवाहन केले. प्रत्येक आमदाराची गेल्या पाच वर्षातील कामगिरी याचा लेखाजोगाही विचारात घेऊन पक्षाची संसदीय समिती उमेदवारीबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही आमदारांवर उमेदवारीची टांगती तलवार अजूनही कायम आहे.

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी त्यांची दारे युतीसाठी खुली असल्याचे काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. मात्र, काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्याचीच भाषा करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये युतीवरून संभ्रम आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते व काही नेतेही बुचकळ्यात आहेत. गोवा फॉरवर्डने काँग्रेसची वाट पाहून अखेर गोव्यात हल्लीच प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे. गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष तसेच मगो हे प्रादशिक पक्षांना स्वबळावर निवडणूक लढविणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक बळ त्यांच्याकडे नाही त्यामुळेच ते एखादा राष्ट्रीय पक्षाबरोबर युती करण्याच्या शोधात आहेत.

Regional parties
Goa Electricity Departmentमध्ये अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

प्रादेशिक पक्षांना उमेदवारांची चिंता

प्रादेशिक पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवणे अशक्यप्राय आहे; मात्र त्यांनी स्वबळावर लढण्याचे ठरविल्यास 40 मतदारसंघात उभे करण्यासाठी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. या पक्षांचा काही ठराविक मतदारसंघातच त्यांचे काही प्रमाणात बळ आहे. त्यामुळे बहुमत मिळवणेही त्यांना शक्य नाही. गोवा फॉरवर्डने तृणमूल काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे तर मगो व आम आदमी पक्ष यांच्यात संवाद सुरू आहे. भाजप व काँग्रेस पक्षाबरोबर युती न करण्याचा निर्णय मगोने घेतला असला तरी ऐनवेळी काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युती करताना प्रत्येक पक्षाला नुकसान व फायदे हे सोसावेच लागणार आहे. त्यातून बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे हे प्रादेशिक पक्षानांही माहीत आहे.

Regional parties
Goa: प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयाचे माजी मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

नागरिकही सावध...

सध्या राज्यातील स्थिती पाहता मतदार कोणाच्या बाजूने आहेत याचा अंदाज येत नाही. प्रत्येक पक्षाच्या सभांना व बैठकांना लोकांची उपस्थिती मोठी असते. लोकांना आगामी निवडणुकीत बदल हवा आहे मात्र त्यासाठी विरोधकांनी एकजुटीने एकत्र येण्याची अपेक्षा या नागरिकांची आहे मात्र पक्षांमध्ये उमेदवारीवरून होत असलेली चढाओढ पाहिल्यास ते घडूच शकणार नाही. त्यामुळे नागरिकही सध्या सावध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com