MLA Carlos Ferreira
MLA Carlos FerreiraDainik Gomantak

Goa Drug Case: अमली पदार्थांच्या व्यापाराबाबत अ‍ॅड. कार्लूस फॅरेरा यांनी सोडले मौन

राज्यात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान यावर अ‍ॅड कार्लूस फॅरेरा यांनी विधान केले आहे.
Published on

गोवा: राज्यात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान यावर अ‍ॅड कार्लूस फॅरेरा यांनी विधान केले आहे. मी सरकारी वकील असताना काही उच्चस्तरीय राजकारणी अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतले आहेत, तसेच त्यांच्या आशीर्वादामुळेच हे चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(MLA Carlos Ferreira)

MLA Carlos Ferreira
Goa Government: गोवा सरकारचे '20' हजार नोकऱ्यांचे ध्‍येय!

ते म्हणाले, मी सरकारी वकील होतो, पण त्या काळातही काही उच्चस्तरीय राजकारण्यांचा यात सहभाग असल्याचे संकेत मिळाले होते आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सुरू होते पोलिसांमध्येही काही काळेबेरे असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सर्व माहिती आहे; त्यांच्याकडून माहिती घ्या पोलिस-राजकारणी यांच्यात काहीतरी संबंध असण्याची शक्यता आहे.

वेर्णा बिर्ला जंक्शनवर गांजासह बिहारच्या तरुणाला अटक

वेर्णा येथील बिर्ला जंक्शनजवळ क्राईम ब्रँचने मूळ बिहारचा व सध्या कुठ्ठाळी येथे राहत असलेल्या संशयित जीतेंद्र सुदर्शन महातो (33वर्षे) याला ड्रग्जप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून 310 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 35 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

क्राईम ब्रँच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठ्ठाळी या परिसरात ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे काल संध्याकाळच्या सुमारास या परिसरामध्ये पोलिस गस्त ठेवण्यात आली होती. बिर्ला जंक्शनजवळ मिळालेल्या वर्णनाशी मिळताजुळता एक तरुण उभा होता.

MLA Carlos Ferreira
Amit Palekar : भाजपचे ‘रात्रीस खेळ चाले’ धोरण!

राज्यात गेल्या महिन्याभरापासून ड्रग्जविरोधात तीव्र कारवाई सुरू

दरम्यान, त्याच्या हालचालीही संशयास्पद होत्या त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन केलेल्या झडतीत त्याच्याजवळ गांजा सापडला. त्याने तो विक्रीसाठी आणला असल्याचे कबूल केले. त्याच्याविरुद्ध अंमलीपदार्थविषयक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशीसाठी त्याला पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

राज्यात गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी ड्रग्जविरोधात तीव्र कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत अधिक तर गांजाची विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. गांजा विक्री करणारे हे बहुतेक परप्रांतीय आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com